जि. प.शाळा पुनवत येथे आज भेट देण्याचा योग आला. मुख्याध्यापिका आदरणीय नगिना नदाफ मॅडम, गुरुबंधू आदरणीय संदीप पवार सर व प्रकाश सावंत सर यांनी मला(प्रविण डाकरे) व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका आदरणीय शर्मिला पवार मॅडम यांना आमंत्रित केले होते. त्यांनी केलेला यथोचित सत्कार म्हणजे माझ्यासाठी माझ्याच बांधवांकडून मिळालेला प्रोत्साहनपर गुणगौरव होता.कमिटीशी हितगुज साधताना आनंद वाटला. पुनवत शाळा,गुणवंत विद्यार्थी, जागृत पालकवर्ग असे अनेक पैलू मनःपटलाच्या शिदोरीत ठेवून माघारी परतलो...