५ वी शिष्यवृत्ती
डिजिटल परिपाठ
*सांगली जिल्हा माजी कलेक्टर(1981/83) आदरणीय लीना मेहेंदळे मॅडम यांची आज प्रत्यक्ष भेट*
📲📲📲📲📲📲📲📲📲📲
*मेहेंदळे मॅडम*
*Former CIC Under RTI Act for Goa at Government of India*
*Former member(admn) CAT GoI AddI chief sec Maharashtra at Govt of India*
*Former ED PCRA at Govt of Maharashtra, India*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संगीतमय पाढ्यांचा व्हिडिओ पाहून व युट्यूब वरील व्हिडिओ पाहून भारावून गेलेल्या आदरणीय मेहेंदळे मॅडम यांनी मला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आज त्या पुण्यावरुन शिराळा येथे आल्या होत्या. जवळपास अडीच तास आमची चर्चा चालू होती. सोबत डाॅ. सुमंत पांडे साहेब (कार्यकारी संचालक, पाणी साक्षरता केंद्र, यशदा, पुणे) उपस्थित होते. इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. सध्याचे सांगली जिल्हा चे कलेक्टर साहेब मा. श्री. व्ही.एन. काळम साहेबांना मेहेंदळे मॅडम यांनी माझी ओळख करून दिली. जणू मृगजळाचा भास होतो की काय, असं मला वाटत होतं... माझे शैक्षणिक व सामाजिक कार्य त्यांच्या प्रत्येक कौतुकाच्या थापेतून माझी ओळख करून देत होते, याचे समाधान मिळत होते. यावेळी मा. प्रकाश पाटील साहेब (पेठ), मा. सुहास पाटील साहेब औदुंबर, शिवाजीराव चौगुले (पत्रकार दै. सकाळ) हे उपस्थित होते.
नवनवीन प्रोजेक्ट वर चर्चा करून आम्ही निरोप घेतला...
-प्रविण डाकरे
प्राथ.शिक्षक ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगली