माय मराठी कविता लिरिक्स | May Marathi Kavita Lyrics :
Music 4 3 2 1 माय मराठी तुझिया पायी तनमनधन मी वाहियले, तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले. माय मराठी तुझिया पायी तनमनधन मी वाहियले, तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले. Music 4 3 2 1 कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई. तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा, हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा. Music 4 3 2 1 माय मराठी तुझिया अंकी लोळण घेते, बागडते, तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते. तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. Music 4 3 2 1 तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची. माय मराठी तुझियासाठी वात होउनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. माय मराठी तुझिया पायी तनमनधन मी वाहियले, तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले. तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले. कविता - संजीवनी मराठेगायन केलेली कविता :
कराओके कविता :
Keywords :
#माय_मराठी_ऑडिओ_कविता
पाचवी मराठी कविता
May Marathi Karaoke Kavita
#गुरुमाऊली #Pravin_Dakare
माय मराठी कविता
पाचवी मराठी कविता
May Marathi Audio Kavita
Tags
पाचवी मराठी कविता
Poem not listening
ReplyDeleteकविता ऐकू येत नाही
DeleteChhan
ReplyDeleteAryan gaikwad
DeleteSanskruti khedkar
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice poem
Deleteछान....👌👌👌👌👌👌
ReplyDeleteहे कविता आपल्या मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे
ReplyDeleteहे कविता आपल्या मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे
ReplyDelete