प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा कविता लिरिक्स | Prashn Vichara Punha Punha Kavita Lyrics :
Music 4 3 2 1 प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ दया लाख चुका प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? Music 4 3 2 1 कुत्र्याची शेपूट वाकडी का? पेंग्विनची मान तोकडी का? क्रिकेटची बॅट लाकडी का? सापाची चाल वेडीवाकडी का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? Music 4 3 2 1 वटवाघळं रात्री फिरतात का? मासे पाण्यात तरतात का? पतंग दिव्यावर मरतात का? काजवे चमचम करतात का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? Music 4 3 2 1 खोकल्याची उबळ येते का? सर्दीत नाक गळते का? मेंदूला वास कळतो का? आठवणीने उचकी लागते का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? Music 4 3 2 1 रंगीत तारे असतात का? दिवसा तारे दिसतात का? जीवसृष्टी आणखी कुठे असेल का? माणसासारखा माणूस दिसेल का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ दया लाख चुका प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का? - सुकन्या आगाशेगायन केलेली कविता :
कराओके कविता :
Keywords :
प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा
Prashn Vichara Punha Punha
abhang
Prashna Vichara Punha
gavlan songs
Tags
पाचवी मराठी कविता