हें कोण गे आई कविता लिरिक्स | He Kon Ge Aai Kavita Lyrics :
Music 4 3 2 1 नदीच्या शेजारी, गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत, वेळूच्या जाळींत दिवसा दुपारी, जांभळी अंधारी मोडकें देऊळ, त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठायीं, राहतें गे आई ? कोण गे त्या ठायीं, राहतें गे आई ? Music 4 3 2 1 चिंचांच्या शेंड्यांना, वडांच्या दाढ्यांना ओढोनी हालवी, कोण गे पालवी? कोण गे जोरानें, मोठ्यानें मोठ्यानें शीळ गे वाजवी? पांखरां लाजवी? सारखी किति वेळ, ऐकूं ये ती शीळ? सारखी किति वेळ, ऐकूं ये ती शीळ? Music 4 3 2 1 वाळली सोनेरी, पानें गे चौफेरीं मंडळ धरोनी, नाचती ऐकोनी किती मीं पाहीलें, इतकेंची देखीलें झाडांच्या साउल्या, नदींत कांपल्या हांका मीं मारिल्या, वांकोल्या ऐकिल्या हांका मीं मारिल्या, वांकोल्या ऐकिल्या Music 4 3 2 1 उरांत धडधडे, धांवतां मी पड़ें पळालों तेथून, कोण ये मागून? कोण गे त्या ठायीं, राहतें गे आई ? कोण गे त्या ठायीं, राहतें गे आई ? - भा. रा. तांबेगायन केलेली कविता :
कराओके कविता :
Keywords :
हें कोण गे आई
हें कोण गे आई कराओके
हें कोण गे आई कराओके कविता
He Kon Ge Aai
He Kon Ge Aai Karaoke
He Kon Ge Aai Karaoke Kavita
#हे_कोण_गे_आई
Tags
चौथी मराठी कविता