SMART PDF म्हणजे काय?
स्मार्ट पीडीएफ ही पीडीएफ असून या
पीडीएफमध्ये टेक्स्ट किंवा इमेजला लिंक जोडलेली असते. त्यामुळे ही पीडीएफ इंटरॅक्टिव्ह
होत असते. ही पीडीएफ ओपन करून ज्या-ज्या लिंक त्यात जोडलेल्या आहेत, त्या लिंकवर
एका क्लिकवर जाता येते. त्यामुळे खूप काही डेटा SMART PDF मध्ये साठवला जाऊ शकतो.
SMART PDF मधून आपण काय काय पाहू शकतो?
स्मार्ट पीडीएफ मध्ये खालील वेबलिंक समाविष्ट
करून माहिती वाचू शकतो, ऐकू शकतो, पाहू शकतो.
·
Audio (ऑडीओ)
·
Video
(व्हिडीओ)
·
Text File (मजकूर)
·
Download Link ( डाऊनलोड लिंक)
·
Article link (लेख)
·
इतर
सर्व वेबलिंक
ब्लॉग लिंक, Youtube Video लिंक, ड्राईव्ह
लिंक अथवा वेगवेगळ्या वेबसाईटच्या लिंक जोडून SMART PDF बनवू शकतो.
How to create SMART PDF in Microsoft Word?
How to create SMART PDF in Microsoft Word?
SMART PDF बनविण्यासाठी वेगवेगळ्या
साईटच्या माध्यमातून बनवल्या जातात. पण आज आपण सोप्यात सोपी पद्धत म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड च्या माध्यमातून आपण स्मार्ट पीडीएफ बनवण्याबद्दल माहिती पाहणार आहोत.
फोटो (Image) ला लिंक कशी
द्यायची?
पीडीएफ मधील इमेजला आपण क्लिक करतो, त्यावेळी
तेथून आपण डायरेक्ट एखाद्या वेबपेजवर कसे जायचे या संबंधी सविस्तर माहिती खाली पहा
-
1. सर्वप्रथम मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन
करा. (यासाठी तुम्हाला स्टार्ट मेनू ला क्लिक करून मायक्रोसॉफ्ट ऑफिस शोधावे लागेल
त्यामध्ये 'Microsoft word' हा ऑप्शन तुम्हाला पहावयास
मिळेल.)
2. वर्ड ओपन केल्यानंतर
त्याच्यामध्ये एक इमेज इन्सर्ट करा(नमुना म्हणून युट्युब चॅनल ची लिंक तुम्हाला
pdf मध्ये समाविष्ट करावयाची असल्यास युट्युब लोगो असलेली png इमेज समाविष्ट करा)
3. त्यानंतर तो फोटो सिलेक्ट करा.
(फोटोवर क्लिक करा.)
4. वरील 'Insert' नावाचा जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करा. Insert ला
क्लिक केल्यानंतर त्याच्या पुढे हायपरलिंक (Hyperlink) नावाचा
एक टॅब दिसतो. त्या टॅबला क्लिक करुन आपण लिंक समाविष्ट
करायची आहे.
5. यानंतर हायपरलिंक (Hyperlink)
या टॅबला क्लिक करा.
6. यानंतर डाव्या बाजुकडील Exiting
File or Web Page या टॅबला क्लिक करा.
7. यानंतर खालील ‘Adress’ या टॅबच्या पुढील
रकान्यात कॉपी केलेली युट्युब लिंक पेस्ट करा.( यासाठी जी लिंक तुम्ही समाविष्ट
करणार आहात ती लिंक कॉपी करून ठेवा व नंतर ‘Adress’ या टॅबमध्ये समाविष्ट करा.)
8. खालील ‘OK’ या बटणाला क्लिक करा. इमेजला
लिंक समाविष्ट झालेली दिसून येईल.
Text(मजकूर)ला लिंक कशी द्यायची?
Text(मजकूर)ला
लिंक समाविष्ट करताना सर्व प्रोसेस सारखीच असून यामध्ये Text
ला लिंक समाविष्ट करताना टाईप केलेला Text सिलेक्ट करावा.
व नंतर वरील
'Insert' नावाचा जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करा. Insert ला
क्लिक केल्यानंतर त्याच्या पुढे हायपरलिंक (Hyperlink) नावाचा
एक टॅब दिसतो. त्या टॅबला क्लिक करुन डाव्या बाजुकडील Exiting
File or Web Page या टॅबला क्लिक करा. यानंतर
खालील ‘Adress’ या टॅबच्या पुढील रकान्यात कॉपी केलेली ब्लॉग लिंक पेस्ट करा.(
यासाठी जी लिंक तुम्ही समाविष्ट करणार आहात ती लिंक कॉपी करून ठेवा व नंतर ‘Adress’
या टॅबमध्ये समाविष्ट करा.)
याप्रमाणे
लिंक समाविष्ट करून झाल्यानंतर वरील डाव्या कोपऱ्यातील File या ऑप्शन ला क्लिक करा
व Export या टॅबला क्लिक करून Create
PDF या टॅबला
क्लिक करा. Word फाईलची SMART PDF तयार झालेली असेल.
SMARTPDF ओपन करून पहा. Youtube इमेजला क्लिक केल्यावर Youtube ओपन होईल. तसेच गुरुमाऊली ब्लॉग ला क्लिक केल्यावर
माझा ब्लॉग ओपन होईल.
वरील
सर्व माहिती व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
आपल्याला संपूर्ण माहिती मिळाली असेल, धन्यवाद ..