आली आली आली पारू शाळेला (2)
शिक्षणाचा ss, शिक्षणाचा
शुभारंभ झाला,
अज्ञानावर प्रभाव हा पडिला
आली आली आली पारू शाळेला (2)
|| धृ ||
बाई गुरुजींच्या मुखी
मायेचा झरा,
लाजरी बुजरी पारू लागली बोलू
तरतरा..
बाई गुरुजींच्या मुखी
मायेचा झरा,
लाजरी बुजरी पारू लागली बोलू
तरतरा..
ओढ शाळेची.....
ओढ शाळेची लागली मनाला,
केले दंडवत विद्याआराधनेला..
आली आली आली पारू शाळेला (2)
|| 1 ||
खेळ,गाणी, गोष्टींपुढे सरली प्रीती,
क्षमतांच्या सागरात डुंबली
किती..
खेळ,गाणी, गोष्टींपुढे सरली प्रीती,
क्षमतांच्या सागरात डुंबली
किती..
निसर्ग सारा,
निसर्ग सारा तिचा मित्र
झाला,
केले आपुले भर पावसाला
आली आली आली पारू शाळेला (2)
|| 2 ||
मुल्यशिक्षाणाचे गीत मनी रुजले
बालफुल शाळेमध्ये फुलू
लागले..
मुल्यशिक्षाणाचे गीत मनी रुजले
बालफुल शाळेमध्ये फुलू
लागले..
हक्क आपुला..
हक्क आपुला तिला हा मिळाला
नाही डरणार ती अन्यायाला
आली आली आली पारू शाळेला (2)
|| ३ ||
झुगारील पारू आता राष्ट्र फुगड्या
विकासाच्या प्रवाहात घेउनी
उड्या
झुगारील पारू आता राष्ट्र फुगड्या
विकासाच्या प्रवाहात घेउनी
उड्या
तोंड देईल..
तोंड देईल भयाण वादळाला,
नाव नेईल सुखाने तटाला
आली आली आली पारू शाळेला (2)
|| 4 ||
शिक्षणाचा ss, शिक्षणाचा
शुभारंभ झाला,
अज्ञानावर प्रभाव हा पडिला
आली आली आली पारू शाळेला (4)
गीतकार व संगीतकार - जयवंत भंडारी
संगीतानं माणसाच्या मनाचा वेध घेता येतो.माणसाच्या जडणघडणीत गाण्याचा महत्वाचा वाटा असतो.लहानपणी होणारे संस्कार पुढे आयुष्यभर त्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात.
संगीतानं माणसाच्या मनाचा वेध घेता येतो.माणसाच्या जडणघडणीत गाण्याचा महत्वाचा वाटा असतो.लहानपणी होणारे संस्कार पुढे आयुष्यभर त्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात.
बालकांच्यामध्ये लहानपणापासुनच विविध संस्कारांचं बीजारोपण व्हावं; शाळांमध्ये बालसुलभ वातावरण तयार होऊन मुलं शाळेत रमावीत; बालकांना योग्य ती स्वरलिपी,योग्य तो आवाज, योग्य तो चढउतार यांचे मार्गदर्शन मिळावे याकरिता "महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तथा विद्या परिषद पूणे " यांनी 15 निवडक गितांची रचना "गीतावली" या नावाने तयार केली आहे.
हे बनवताना या विद्यापरिषदेचे संचालक श्री. नामदेवराव जरग यांची प्रेरणा, विद्या परिषदेच्या कलाकारांचे योगदान तसेच बालचित्रवाणी अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे..या सर्वांना साष्टांग दंडवत. प्रस्तुत गीतेे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न...
समूहगीत - धोय धोय पाऊस
समूहगीत - आनंदाचे गाणे
Tags
समूहगीत
एकदम मस्त 👌👌👌💐💐
ReplyDeleteअतिशय छान
ReplyDeleteछान अप्रतिम
ReplyDeleteडिजिटल परिपाठ खूप छान केला आहे याची लिंक आदल्या दिवशी मिळाली तर बरे होईल मुलांना नियोजन करून द्यायला बरे पडते
ReplyDelete