धितांग तांग, धितांग तांग,
धितांग तांग तांग (2)
धोय धोय धोय धोय पाऊस
पडतोय रे,धितांग तांग, धितांग तांग,
माझ्या मनीचा मोर कसा
नाचतोय रे, तकीटधा तकीटधा..
धोय धोय धोय धोय पाऊस
पडतोय रे,धितांग तांग, धितांग तांग,
माझ्या मनीचा मोर कसा
नाचतोय रे, तकीटधा तकीटधा.. || धृ ||
पाऊस रानात, पाऊस पानात,
पाऊस वाऱ्यात, डोंगरदऱ्यात (2)
टेरेस,बाल्कनी, भिजवुनी
जातोय रे, धितांग तांग, धितांग तांग,
माझ्या मनीचा मोर कसा
नाचतोय रे, तकीटधा तकीटधा..
धोय धोय धोय धोय पाऊस
पडतोय रे, धितांग तांग, धितांग तांग,
माझ्या मनीचा मोर कसा
नाचतोय रे, तकीटधा तकीटधा.. || 1 ||
झिम्मड पाऊस वेल्हाळ
वाटतो, नदीत तुफान दुथडी वाहतो (2)
रेनकोट नसताना पाऊस गाठतोय
रे, धितांग तांग, धितांग तांग,
माझ्या मनीचा मोर कसा
नाचतोय रे, तकीटधा तकीटधा..
धोय धोय धोय धोय पाऊस
पडतोय रे,धितांग तांग, धितांग तांग,
माझ्या मनीचा मोर कसा
नाचतोय रे, तकीटधा तकीटधा.. || धृ ||
मुसळधारांनी पडतो पाऊस, वाकडातिकडा
कोसळतो पाऊस (2)
चारही दिशांनी पाऊस झोडतोय
रे, धितांग तांग, धितांग तांग,
माझ्या मनीचा मोर कसा
नाचतोय रे, तकीटधा तकीटधा..
धोय धोय धोय धोय पाऊस
पडतोय रे,धितांग तांग, धितांग तांग,
माझ्या मनीचा मोर कसा
नाचतोय रे, तकीटधा तकीटधा.. || 3 ||
⧭ Mp3 ऐका खालील बटणावरून ⧭
⧭ कराओके Mp3 ऐका खालील बटणावरून ⧭
गीत - सौ. चारुता प्रभुदेसाई , संगीत – अजय पराड
संगीतानं माणसाच्या मनाचा वेध घेता येतो.माणसाच्या जडणघडणीत गाण्याचा महत्वाचा वाटा असतो.लहानपणी होणारे संस्कार पुढे आयुष्यभर त्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात.
गीत - सौ. चारुता प्रभुदेसाई , संगीत – अजय पराड
संगीतानं माणसाच्या मनाचा वेध घेता येतो.माणसाच्या जडणघडणीत गाण्याचा महत्वाचा वाटा असतो.लहानपणी होणारे संस्कार पुढे आयुष्यभर त्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात.
बालकांच्यामध्ये लहानपणापासुनच विविध संस्कारांचं बीजारोपण व्हावं; शाळांमध्ये बालसुलभ वातावरण तयार होऊन मुलं शाळेत रमावीत; बालकांना योग्य ती स्वरलिपी,योग्य तो आवाज, योग्य तो चढउतार यांचे मार्गदर्शन मिळावे याकरिता "महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तथा विद्या परिषद पूणे " यांनी 15 निवडक गितांची रचना "गीतावली" या नावाने तयार केली आहे.
हे बनवताना या विद्यापरिषदेचे संचालक श्री. नामदेवराव जरग यांची प्रेरणा, विद्या परिषदेच्या कलाकारांचे योगदान तसेच बालचित्रवाणी अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे..या सर्वांना साष्टांग दंडवत. प्रस्तुत गीतेे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न...
समूहगीत - आनंदाचे गाणे
Tags
समूहगीत
अतिशय सुंदर उपक्रम
ReplyDeleteSatisfied everday as a teacher
ReplyDelete