प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून मा.उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे ६००० पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत असून याबाबत पत्रदेखील काढलेले आहे.
शिक्षणमंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर देखील ट्वीट केले आहे.