🌈 लेखिका आमच्या भेटीला
🖥️ विद्या मंदिर वेंगरूळ शाळेचा नवीन उपक्रम
इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील मिठाचा शोध या पाठाच्या लेखिका आदरणीय मा.अंजली अत्रे मॅडम यांनी आज पुण्यावरून आमच्या विद्या मंदिर वेंगरूळ शाळेतील विद्यार्थ्यांशी फेसबुक व्हिडीओ कॉलिंग च्या मदतीने ऑनलाईन संवाद साधला.शाळेचे मुख्याध्यापक श्री.उत्तमकुमार पाटील सर व सर्व स्टाफने त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी हा पाठ कसा सुचला, याची सविस्तर स्टोरी विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून संवाद साधला. प्रत्यक्ष फेसबूक व्हिडीओ कॉलिंग च्या मदतीने लेखिका आपल्याशी बोलत असल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना आनंदित करणारा होता.
लेखिका म्हणून बोलत असताना त्यांनी त्यांच्याकडे असलेले विविधांगी कलागुण देखील विद्यार्थ्यांना दाखविले. यामध्ये पेंटिंग, व्यक्तिमत्व विकासाचे पैलू, परसबाग अनुभवताना मुलेही खुश झाली. त्यांच्या बोलण्यातून निसर्गाबाबत असलेली गोडी व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना मिळणारा आनंद जाणवला. आमच्या शाळेत प्रथमच पाठ्यपुस्तकातील एक लेखिका आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना आमचा आनंद गगनात मावेनासा होता.