दैनंदिन निरीक्षण नोंदी - कला
पहिली ते आठवी कला विषयाच्या दैनंदिन निरीक्षण नोंदी खाली नमुनादाखल दिलेल्या आहेत.
चित्रे सुंदर काढतो.
भौमितिक आकार रेखाटतो.
योग्य रंग भरतो.
प्रमाणबद्ध रेखाटन करतो.
विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.
कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.
वर्ग सजावट करतो.
मातीपासून विविध आकार बनवितो.
मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो.
रंगाच्या छटातील फरक ओळखतो.
चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.
कलेचे विविध प्रकार समजून घेतो.
मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो.
चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो.
चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो.
कलात्मक दृष्टीकोन ठेवतो.