तुम्हाला अंकांची जादू पहायची आहे का? तुम्ही 9423309214 किंवा 9404974356 यापैकी कोणत्याही व्हाट्सअप नंबरला 1 अंक टाका, तुम्हाला पहिलीचा अभ्यास तात्काळ मिळून जाईल. 4 अंक टाकल्यावर चौथीचा अभ्यास मिळेल. विद्या मंदिर वेंगरूळ येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक प्रविण डाकरे
व विद्या मंदिर चाफेवाडी येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक जयदीप डाकरे यांनी कोरोना परिस्थितीत शाळा बंद असल्याने शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने 'मोबाईल टीचर' नावाचा एक भन्नाट उपक्रम तयार केलेला आहे. इयत्ता पहिली ते सातवी साठी अत्यंत उपयुक्त असा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण या उपक्रमाने सुलभ केले आहे.या उपक्रमात आठवी ते दहावीच्या फक्त दीक्षा लिंक समाविष्ट केलेल्या आहेत.
सध्याच्या परिस्थितीत शिक्षक व विद्यार्थी समोरासमोर नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये या उद्देशाने त्यांना प्रत्येक घटकाचा कंटेंट दीक्षा लिंक, ऑडिओ, व्हिडिओ, ऑनलाईन टेस्ट या स्वरुपात सहज उपलब्ध व्हावा या उद्देशाने या उपक्रमाची निर्मिती केलेली आहे. सर्वच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना त्या त्या घटकाचा कंटेंट गूगल किंवा यूट्यूब द्वारे सहज उपलब्ध होत नाही किंवा सर्च करताना अडचणी येतात. सध्याच्या परिस्थितीत अनेक लोक व्हाट्सअप चा वापर करतात. त्यामुळे व्हाट्सअप च्या माध्यमातून हा जर कंटेंट त्यांना सहज उपलब्ध झाला तर मुलांचे शिक्षण थांबणार नाही. फक्त व्हाट्सअप नव्हे तर ट्विटर, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, सिग्नल या सोशल माध्यमावर देखील दिलेल्या नंबरला वैयक्तिक मेसेज केल्यास अभ्यास तात्काळ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांमध्ये सुरुवातीला शासनाच्या दीक्षा ॲप च्या लिंक समाविष्ट केलेल्या असून घटकानुसार ऑडिओ, व्हिडिओ,ऑनलाईन टेस्ट अपडेट होत आहेत.
सध्या शासनाकडून दैनंदिन अभ्यासमाला, स्वाध्याय उपक्रम, ब्रिज कोर्स, सह्याद्री वाहिनी वरून ज्ञानगंगा कार्यक्रम, शैक्षणिक दिनदर्शिका असे अनेक उपक्रम सुरु असून त्यात 'मोबाइल टीचर' या नवीन उपक्रमाची भर पडलेली आहे. विद्यार्थी दिवसभरात केव्हाही मेसेज करून हव्या त्या घटकाचा अभ्यास करू शकेल. या उपक्रमाचे विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्याने पाठ्यपुस्तकातील घटकाचे नाव आहे तसे जरी टाईप करून पाठवले, तरीही त्या घटकाचा अभ्यास तात्काळ मिळतो.
या उपक्रमाची दखल शिक्षण उपसंचालक मा.श्री. विकास गरड यांनी घेतली असून हा प्रोजेक्ट शासन स्तरावर राबवू असे म्हणाले. सध्या प्रविण डाकरे यांना अभ्यासमाला कोअर टीममध्ये देखील समाविष्ट केलेले आहे.
डाकरे बंधूंचा 'माझा अभ्यास' या नावाने PDF उपक्रम लॉकडाऊन मध्ये जून 2020 पासून सतत सुरु असून याद्वारे ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू ठेवले आहे.दररोज पहिली ते सातवी च्या सात पीडीएफ गृपवर पाठवल्या जातात.अभ्यासाबरोबर ऑनलाईन टेस्ट व विविध उपक्रम देखील घेतले जातात. दररोज लाखो विद्यार्थ्यांपर्यंत हा अभ्यास पोहोचला जातो.
*उपक्रमाची वैशिष्ट्ये :*
१) इयत्तेचा अंक टाका व अभ्यास मिळवा.
२) एका क्लिकवर 9423309214/9404974356 या नंबरला व्हाट्सअपवर ऑनलाईन अभ्यास
३) पाठाचे अचूक नाव टाकले तरी लगेच अभ्यास उपलब्ध
४) शासनाच्या दीक्षा ॲप चा प्रभावी वापर
५) अभ्यास विषय निवडण्याचे स्वातंत्र्य
६) घटकानुसार ऑनलाईन टेस्ट समाविष्ट
७) घटकानुसार ऑडिओ, व्हिडिओ लिंक उपलब्ध
८) तर्कशास्त्र व अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नरचना
९) व्हाट्सअप बरोबरच ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, मेसेंजर ,सिग्नल वर देखील अभ्यास उपलब्ध