गारगोटी: दि.6 जून
श्री मौनी विद्यापीठ संचलित, आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने शिवस्वराज्य दिन उत्साह मध्ये साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रतिमा पूजन द्वितीय वर्षातील छात्र प्रशिक्षणार्थी अमृता चंद्रेकर व रणजीत गायकवाड यांनी केले. कार्यक्रम पत्रिका अमृता चंद्रेकर यांनी बनवली. तसेच द्वितीय वर्षातील छत्रप्रशिक्षणार्थी किरण मासाळ यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेखाटलेल्या पेन्सिल स्केच प्रतिमेचे अनावरण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.पी. बी. दराडे होते. प्रमुख उपस्थिती महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद प्रा. डॉ.आर. के. शेळके,प्रा.डॉ. पी. एस. देसाई, प्रा. डॉ.एम. एन. मोरे तसेच, प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व छात्रप्रशिक्षणार्थी होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले,उपस्थित सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये नीलम शेडगे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगितली.
प्रशिक्षणार्थी मनोगतामध्ये, सायली खोत यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक धोरण,सामाजिक धोरण व सर्व धर्मांविषयी असणारा आदर यावर भाष्य केले. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे व्हिडिओ क्लिप द्वारे सादरीकरण केले.प्रशिक्षणार्थी प्रशांत भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांना असणारा स्त्रियांबद्दलचा आदर, स्वराज्यासाठी केलेला त्याग, त्यांची युद्धनिती सांगितली. संगीता नाळे यांनी आपल्या मनोगतातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र उभारले.नीलम पाटील यांनी पीपीटी सादरीकरणाचा उत्तम वापर करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांविषयी थोडक्यात माहिती करून दिली.
कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.आर. के. शेळके यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती व त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य करण्याची पद्धती , त्याच बरोबर त्यांचे आपल्या मावळ्यां प्रती असलेली समान वागणूक, स्वराज्य स्थापनेची भावना, सहकार्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या क्षमता नुसार निर्माण केलेले अष्टप्रधान मंडळ यावर भाष्य केले. प्रा. डॉ. पी. एस.देसाई यांनीही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी असणारा आदर आपल्या मनोगतातून व्यक्त केला. प्रा. डॉ.एम. एन.मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना यांनी प्रा.डॉ.पी. बी. दराडे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज हे एक योगी पुरुष कसे होते यावर भाष्य केले. त्याच बरोबर बी.एड द्वितीय वर्षातील छात्र प्रशिक्षणार्थींनी *शिवस्वराज्य दिन* या कार्यक्रमाचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन, नियोजन, व अंमलबजावणी मार्गदर्शक प्रा. डॉ.आर. के. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे केले याबद्दल विशेष गौरव उद्गार काढले. या कार्यक्रमासाठी श्री मौनी विद्यापीठचे संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.डी. बेलेकर यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले . कार्यक्रमाचे आभार शितल चिंदगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी द्वितीय वर्षातील सर्व प्रशिक्षणार्थींनी परिश्रम घेतले.
खूप छान 👍👍
ReplyDeleteThank you sir
ReplyDelete