15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून स्वातंत्र्यदिनादिवशी ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
भारत एक महासत्ता | १५ ऑगस्ट मराठी निबंध/भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Bharat Ek Mahasatta | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
निबंध/भाषण विषय-भारत एक महासत्ता | Bharat Ek Mahasatta
भारत एक महासत्ता | १५ ऑगस्ट मराठी निबंध/भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Bharat Ek Mahasatta | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
इतर भाषणे : १) मी तिरंगा बोलतोय
निबंध/भाषण-भारत एक महासत्ता
भारत एक महासत्ता -1 ''जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती हे बसेरा
वह भारत देश हे मेरा , वह भारत देश हे मेरा !
१९४७ पुर्वीचा स्वप्नातला भारत अणि गेल्या ६० दशकांपासून महासत्तेकडे वाटचाल करणारा भारत याबद्दल आता असे म्हणावे लागेल ....
''आचार विचार ऐवजी आहे भ्रष्टाचार
समता, बंधुभाव ऐवजी आहे विषमता
धर्मनिरपेक्षता ऐवजी आहे जातीवाद
हेच आहे महासत्ता न होण्याचे विवाद ''
जागतिक पातळीवर भारताचे मार्गक्रमण महासत्ता होण्याकडे चालू आहे अस बोललं जाते ! पण खरंच अस चित्र आहे का भारताचं? महासत्ता होणारा भारत म्हणजे नेमका कोणता भारत ? जो ७० % खेड्यात वसला आहे तो भारत की शहरात वसला आहे तो भारत ? श्रीमंताचा भारत की गरीबांचा? जो आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे असा वर्गाचा भारत की , जो दोन वेळा अन्नासाठी उपासमारी सहन करतो त्या वर्गाचा भारत ? जो अलिशान बंगल्यामध्ये राहतो त्याचा की, ज्याला राहायला घर नाही म्हणून फुटपाथ वर मरतो त्यांचा? जो महिन्याकाठी लाखो रुपये कमावतो त्यांचा की , टीचभर पोटाची खळगी भरण्याकरिता दारोदार फिरतो त्यांचा ?असे एक न एक अनेक प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतात , तेव्हा वाटत की , आपला देश खरच महासत्ता होण्याकडे चालला आहे?
भारतला महासत्ता होण्यासाठी अजून अनेक पातळीवर काम करणे गरजेचे आहे . यात साधारणपणे आरोग्य , दळण वळण यांची साधने,पिण्याचे पाणी ,शिक्षण , प्रत्येक कमावत्या हाताला रोजगार , शेतीसाठी पाण्याचे नियोजन ,नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर , राष्ट्रीय सुरक्षा , अंतर्गत जातीवाद ,सीमावाद , वंशवाद ,भ्रष्टाचार यासारखे अनेक प्रश्न आजही भारतासमोर आजही उभे थकलेले आहेत .यासर्व प्रश्नांना सोडविण्यासाठी आजची आपल्या देशाची राजकीय इच्छाशक्ती आहे का ? आपल्या देशाचे राजकारण किंवा देशाचे राजकीय प्रतिनिधित्व करणारे हे किती नैतिकतेला आधारित राजकारण करतात ?आज ते नैतीकतेपेक्षा अनैतिक काम करण्यात जास्त सुस्तावले आहेत . जिथे दोन वेळचे पोटभर अन्न लोकांना मिळत नसेल तेथे तुम्ही काय देशाचा विकास करणार आणि कसा तुमचा देश महासत्ता होणार ?
भारतात तरुणांची संख्या जागतिक पातळीवर इतर विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे, पण मग त्या तरुणाच्या हाताला काम आहे का?आज सगळीकडे पहिले तर नैराश्याची भावना तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते , का? तर जिकडे पाही तिकडे भ्रष्टाचार फोफावला आहे . कोणत्याही क्षेत्रात काम मागण्यासाठी जाणारा तरुण हा रिकाम्या हाताने परत येतो. का? तर एकतर तो अप्रशिक्षित असतो अथवा त्याच्याकडे मागितली जाणारी लाच . अशा कारणाने भारतातील युवापिढी खचत चालली आहे . यातूनच मग तरुण वाममार्गाला लागतात .पण सरकार किंवा विरोधी पक्षाला याच काही सोयसुतक नाही. का? तर युवा जर शिकला सवरला तर राजकारण्यांच्या दरी जाईल कशाला . म्हणून जाणीवपूर्वक युवा पिढीला बरबाद करण्याचे षड्यंत्र भारतीय राजकारणात अवलंबले जाते . घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९६० ते १९७० च्या दशकात इ. १ ली ते ८ वी चे शिक्षण मोफत व सक्तीने सांगितले होते . जर शासन कर्त्यांनी त्या वेळेस हे धोरण अवलंबिले असते, तर आज कदाचित सर्व शिक्षण मोफत राहिले असते.कारण दर दहा वर्षांनी शिक्षणाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी पुढचे शिक्षण हे जर मोफत केले असते तर मला नाही वाटत आज भारतातला एकही व्यक्ती शिक्षणापासून दूर राहिला असता . साक्षरता १०० % असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात निपुण. आपण खरच डोळस असाल तर आपल्याला नक्की दिसेल कि , भारतीय समाजात कशाप्रकारे भेदभाव निर्माण केला जातो . जात-पात ,गरीब-श्रीमंत,भाषावाद , प्रांतवाद ,वंशवाद अशा एक ना एक वादातून भारतीयांची माने कळशीत केली जात आहेत . राजकारण करताना आपण भारतीय आहोत याचे प्रत्येकाने भान ठेवल तर, मला नाही वाटत कि भारतात जन्म घेणारा माणूस कधी स्वत:ला कमी लेखेल अथवा जागतिक पातळीवर त्याला कोणी कमजोर समजेल . पण नाही ना! आमच राजकारणच या सर्व गोष्टींवर चालत असेल तर मग आम्ही राजकारणी कस काय या सगळ्यांपासून लांब राहू . असे सांगतात कि 'भारतात सोन्याचा धूर निघायचा'. म्हणजे खरच अस काही होत का ? तर नाही ! याचा अर्थ असा होता कि, भारत एक सुजलाम -सुफलाम देश होता . सर्व युरोपीय राष्ट्रांचे लक्ष भारताकडे होते . कारण भारतात नैसर्गिक संपत्तीचा फार मोठा खजिना होता .आसेतुहिमाचल पसरलेल्या हिरव्यागार डोंगर रांगा, बारमाही नद्यांचे खळाळते पाणी, सुपीक मैदानी प्रदेश ,घनदाट जंगल हे सुंदर वर्णन आता फक्त कादंबऱ्या यापुरताच मर्यादित असणार का ? जगातील प्रत्येक देश विकासाकडे वाटचाल करताना पर्यावरण संवर्धनाकडे जाणीवपूर्वक लक्ष घालत आहे . कारण पर्यावरण हा देशाच्या विकासातला सर्वात महत्त्वाचा भाग असतो .पण नेमक उलट चित्र आपल्या भारतात दिसत आहे .भारतीयांनी आपल्याच रहासला आमंत्रण देण्याचे काम चालू केले .जगातील छोटे चोप्ते राष्ट्र आज पर्यावरणामुळे जागतिक आकडेवारीत पुढे आले आहे. पर्यावरण निर्देशांकानुसार जर पहिले तर भारत या यादीत १५५ व्या स्थानावर आहे . स्वित्झर्लंड सारखा देश आज जगात पर्यावरण निर्देशांकात १ नंबर ला आहे . ऑस्ट्रेलिया, सिंगापूर,जर्मनी,इंग्लंड ,कॅनडा,जपान,फ्रांस,अमेरिका,रशिया,ब्राझील यासारखे अनेक देश पर्यावरण संवार्धानामुळे जगात पर्यावरण निर्देशांकात पुढे आहे .
पर्यावरणीय कामगिरी ढासळण्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत.
- देशातील आर्थिक किंवा राजीकीय अस्थिरता.
- पर्यावरणीय धोरणाला बगल किंवा दुर्लक्ष .
मग आपण का मागे आहोत?
- आपल्या देशात पर्यावरण विषयाला प्राथमिक स्थान नाही .
- राजकीय उदासीनता .
- अनेक शहरांमध्ये घनकचरा,सांडपाणी यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत,इंधन,वीजनिर्मिती हे प्रकल्प सुरु केले.मात्र सध्या बहुतेक प्रकल्प अकार्यक्षम आहे. .
- पर्यावरण विषयक जागृतीचा अभाव .
- व्यक्ती स्वच्छतेला प्राधान्य पण सामाजिक स्वच्छतेकडे कानाडोळा' ही वृत्ती.
- पर्यावरण विषयक कायदे सक्षम मात्र अंमलबजावणीत अपयश.
खरच पर्यावरण देशाच्या विकासात महत्त्वाचा घटक आहे काय ? तर त्याच उत्तर आहे होय ! कारण मानवासह सर्व जातीच्या अस्तित्वासाठी आणि भावी पिढ्यांच्या विकासासाठी पर्यावरण रक्षण आणि संवर्धन ह्या गोष्टी नुसत्या अत्यावश्यक नाही तर अपरिहार्य आहेत.हे भारतीयांना समजलेच पाहिजे. भारताच्या अडचणीतला अजून एक अडसर म्हणजे इथली . जातीव्यवस्था. भारतीय माणूस आज जातीधर्माच्या डोंगरामध्ये बांधला गेला आहे .इथल्या अनादी काळापासून चालत आलेल्या व्यवस्थेने आम्हाला जाती धर्मामध्ये एवढ गुरफटून टाकलंय की, आम्ही या सगळ्यांच्या मागे लागून आमच्याच प्रगतीत बाधा निर्माण आहे .धर्मवेडेपणा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा, यामुळे आमचा विज्ञानी दृष्टीकोन हरवला आहे . आम्ही आमच्या प्रत्येक कामासाठी देवावर अवलंबून राहतो . चांगल झाल तरी देव आणि वाईट झाल तरी देव अशी आपल्या भारतीयांची भावना आहे. यामुळे आपल्या विकासात फार मोठी अडचण निर्माण होत आहे . श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. इथे कोण्या एका जातीधर्माचा नाही तर, सर्वत्र हेच भारतातील खेड्यांपासून मोठ-मोठ्या शहरांपर्यंत दिसत. भारतातील देऊळे जर बघितली तर आपण विचार करू शकत नाही एवढी संपत्ती तेथे आहे . पण या संपत्तीचा उपयोग कशासाठी होतो व कुठे होतो याचा काही थांगपत्ता नाही. जर ही सर्व संपत्ती भारताच्या तिजोरीत जमा झाली ,तर हरत हा जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखला जाईल .अरे हो! पण तो पैसाही योग्य त्या ठिकाणी वापरणाऱ्याच्या हातात गेला तर ? भारतात या मंदिर संस्कृतीमुळे माणूस देवांबरोबर गटातटात विभागाला गेला. यामुळेच की काय माणसात स्वातंत्र, समता, बंधुत्वता ,न्याय या चार सूत्रांवर आधारित मानवी स्वभाव आता अभावानेच दिसत आहे.का अस व्हावं याचा उलगडा होणे तसे कठीणच आहे .समाज व्यवस्था अशी तयार झाली आहे कि ,त्याला बदलाने सर्वसामान्य माणसाचे काम नाही अशी धारणा सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झाली आहे .हे सगळे का होत तर माणसामध्ये निर्माण होणारी ''असुरक्षितता,अस्वस्थता आणि अराजकता''. भारतात आजही माणसाचे धोक्यात आहे. अनेक व्याधींनी आपला समाज वेढला गेला आहे .एच.आय.व्ही., हृदयरोग, मधुमेह, अस्थमा यासारखे अनेक रोगी भारतात मोठ्या प्रमाणावर दिसतात . तसेच कुपोषणाचे बळीही सहज दिसून येतात . जागतिक गणनेनुसार भारतात २००० साली ४७% बालक कुपोषित म्हणजे जे सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी वजनाचे आहेत .यात वर्गवार वाटणी केली तर शहरी भागात ५० %, ग्रामीण भागात ३८ %, मुलींमध्ये ४५.५% अनुसूचित जातींमध्ये ५६.२ ,अनुसूचित जमातीमध्ये इतर जातींमध्ये ४४.१% वैशिष्ट्ये म्हणजे द हिंदू या राष्ट्रीय वृत्तपत्रात फेब्रुवारी २०१० च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणीनुसार एकट्या पुरोगामी महाराष्ट्रात दर वर्षी साधारण ४५००० बालके या कुपोषणाचे बळी ठरतात. देशपातळीवर महाराष्ट्रात ११% कुपोषणाचे प्रमाण आहे .परंतु यावर देशपातळीवर विशेष काय पाऊल उचलले जाते . आजही आदिवासी भागात निटनेटके रस्ते नाही ,दवाखाने नाहीत ,शिक्षणाच्या सुविधा नाहीत . मग जर आपल्या देशाचा ६०% भारत जर या सगळ्या सेवा सुविधांपासून वंचित असेल तर हा महासत्ता होणारा भारत आहे हा खरच आमचाच देश आहे का ?का आम्ही या महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या देशापासून वेगळे आहोत ! असा सर्वसामान्य प्रश्न माझ्या मनात येतो . म्हणून भारतीय माणसाचे राजकारण आणि राजकारणातील नैतिकता, मानवी नीतीमूल्यांचीजपवणूक, समान पातळीवर मानवी उत्कर्षासाठी नियोजन, सार्वजनिक संपत्तीचे संगोपन , नैसर्गिक साधनांचा योग्य वापर ,अन्न ,वस्त्र, निवारा या गेल्या १०० वर्षातल्या अत्यावश्यक गरजांचा.संकलित पोस्ट (वेबस्त्रोत : विकिपीडिया )
''जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती हे बसेरा
वह भारत देश हे मेरा , वह भारत देश हे मेरा !
समता, बंधुभाव ऐवजी आहे विषमता
धर्मनिरपेक्षता ऐवजी आहे जातीवाद
हेच आहे महासत्ता न होण्याचे विवाद ''
- देशातील आर्थिक किंवा राजीकीय अस्थिरता.
- पर्यावरणीय धोरणाला बगल किंवा दुर्लक्ष .
- आपल्या देशात पर्यावरण विषयाला प्राथमिक स्थान नाही .
- राजकीय उदासीनता .
- अनेक शहरांमध्ये घनकचरा,सांडपाणी यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत,इंधन,वीजनिर्मिती हे प्रकल्प सुरु केले.मात्र सध्या बहुतेक प्रकल्प अकार्यक्षम आहे. .
- पर्यावरण विषयक जागृतीचा अभाव .
- व्यक्ती स्वच्छतेला प्राधान्य पण सामाजिक स्वच्छतेकडे कानाडोळा' ही वृत्ती.
- पर्यावरण विषयक कायदे सक्षम मात्र अंमलबजावणीत अपयश.
इतर भाषणे : १) मी तिरंगा बोलतोय
15 august marathi bhashan | Swatantryadin Bhashan | 15 ऑगस्ट - मराठी भाषणे