श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष प्रश्नमंजुषा | SHRI KRISHNA JANMASHTAMI PRASHNMANJUSHA
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपले ज्ञान अद्ययावत असावे या उद्देशाने विशेष प्रश्नमंजुषा खाली दिलेली असून आपण सोडवू आपले ज्ञान अद्ययावत ठेवू शकता. एकूण 20 प्रश्न समाविष्ट असून प्रत्येक प्रश्नाला पाच गुण आहेत. त्यामुळे ही टेस्ट 100 गुणांची आहे. प्रस्तुत टेस्ट आपल्याला नक्कीच आवडेल.
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष प्रश्नमंजुषा | SHRI KRISHNA JANMASHTAMI PRASHNMANJUSHA
श्रीकृष्ण जन्माष्टमी माहिती | SHRI KRISHNA JANMASHTAMI MAHITI
श्रीकृष्ण जन्माष्टमी माहिती | SHRI KRISHNA JANMASHTAMI MAHITI
या सणामागील पौराणिक कथा अशी की श्रीकृष्णाचा मामा कंस. कंसाने प्रजेला खूप छळले. श्रीकृष्णाच्या आई-वडिलांना त्याने तुरुंगात ठेवले कारण त्यांना होणा-या मुलांपैकी एकजण कंसाचा वध करणार अशी आकाशवाणी झालेली होती. कृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आई-वडिलांना बंदिवासातून मुक्त केले. ही कथा सर्वज्ञात आहेच. पुढे याच श्रीकृष्णाने कौरव-पांडव युध्दात पांडवांची बाजू घेऊन कौरवांचा पराभव केला. या गोष्टीचे स्मरण व्हावे म्हणून भारतात सर्व ठिकाणी गोकुळ अष्टमी हा सण उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो ते सर्वजण ह्या दिवशी उपवास करतात. रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतात, काल्याचे कीर्तन करतात व सुंठवडा प्रसाद म्हणून वाटतात. ह्या दिवशी पाळणा फुलापानांनी सजवून तयार करतात. बळीराम, श्रीकृष्ण यांच्या मूर्ती तयार करून त्या पाळण्यात निजवतात. त्यास तोडे, साखळया असे दागिने घालतात. त्यांची पूजा करतात.
दुस-या दिवशी पारणे करतात. दहीहंडी फोडण्याचा सार्वजनिक कार्यक्रम चौकाचौकातून करतात. दहीहंडी म्हणजे मातीचे एक मडके असते. त्यात ज्वारीच्या लाह्या, पोहे, खोबरे, दही, साखर वगैरे पदार्थ कालवून घालतात व ही हंडी २०-२५ फूट उंचावर बांधून ठेवतात. मुले एका वर्तुळाकारात उभी रहातात व त्यांच्या खांद्यावर दुसरी मुले असे करीत उतरंड करून दहीहंडी फोडतात. आतील पदार्थ प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. दहीहंडी फोडण्यासाठी हजारो रुपयांची बक्षिसे लावलेली असतात.
गोकुळअष्टमीच्या दिवशी पूजा करीत असताना एखाद्या सवाष्ण स्त्रीने स्वतःला मूल होण्यासाठी पूजेतला बाळकृष्ण जर चोरून नेला तर तो शुभ समजला जातो. तो चोरलेला बाळकृष्ण वाजत-गाजत घरी नेतात. यथासांग पूजाअर्चा करतात. आपले कार्य सिध्दीस गेल्यावर तोच बाळकृष्ण पुन्हा वाजत गाजत आणून ज्या ठिकाणाहून चोरून नेला असेल तिथेच परत नेऊन ठेवतात. हा उत्सव श्रावण वद्य प्रतिपदेपासून गोकुळअष्टमीपर्यंत म्हणजे श्रावण वद्य अष्टमी पर्यंत असतो.
Tags
प्रश्नमंजुषा
खूपच सुंदर होती प्रश्नमंजुषा
ReplyDeleteNice
ReplyDelete👌👌👌👌खूप सुंदर माहिती..
ReplyDeleteखूप छान..
ReplyDeleteछानखूपच
ReplyDelete