15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपयुक्त मराठी भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून स्वातंत्र्यदिनादिवशी ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
माझा प्रिय भारत देश | १५ ऑगस्ट मराठी भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Maza Priy Bharat Desh | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
भाषण विषय - माझा प्रिय भारत देश | Maza Priy Bharat Desh
माझा प्रिय भारत देश | १५ ऑगस्ट मराठी भाषण २०२१ | स्वातंत्र्यदिन भाषण | Maza Priy Bharat Desh | Swatantryadin Bhashane | 15 august marathi bhashane
इतर भाषणे : १) मी तिरंगा बोलतोय
स्वातंत्र्यदिन भाषण- माझा प्रिय भारत देश
आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व माझ्या बालमित्रांनो...!
आज मी तुम्हाला १५ ऑगस्ट निमित्त चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती...!
अभिमान वाटतो भारत देशात जन्माला आल्याचा....अभिमान वाटतो देशाच्या संस्कृतीचा.... देशाच्या परंपरेचा...
आपण सर्वांना अभिमानाने सांगतो की माझा देश भारत आहे आणि मी भारताचा नागरिक आहे. भारत देश हा प्राचीन आणि सर्वधर्म-समभावसाठी खूप प्रसिद्ध आहे. भारत देशात सर्व जाती धर्माच्या लोकांना आश्रय मिळतो. माझा भारत देश विविध कला, स्मारके, संस्कृती, नाट्य, नद्या, समुद्र आणि बऱ्याच काही गोष्टींसाठी खूप खूप प्रसिद्ध आहे. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे, भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे आणि राष्ट्रीय फूल कमळ आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे आणि मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे.
शाळेत असताना भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रतिज्ञा आपण दररोज घेतो आणि मगच शाळेच्या दिवसाला सुरुवात करतो. शाळेत शिकतांना कोणत्या ना कोणत्या पुस्तकात भारताचे नाव येतेच आणि आपल्याला गर्व वाटण्यास भाग पडते. मुख्यतः इतिहास, भूगोल ह्या विषयांत भारताचा उच्चार होतच असतो. इतिहासात आपल्या भारताने किती झेंडे गाडलेत आणि आपल्या देशासाठी किती वीर जवानांनी आपले रक्त वाहिले आहे हे बघायलाच मिळते. छत्रपती शिवाजी महाराज भारत देशातच जन्माला आले होते आणि त्यांची वीर गाथा तर सर्वांनाच माहीत आहेत. शिवाजी महाराजांनी कमवलेले, बनवलेले गड – किल्ले भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात भारी मात्राने प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासारखे अनेक वीर जवान आपल्या भारत देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून गेले आणि काही स्वतंत्र सैनिक आहेत जसे भगत सिंग, सुभाषचंद्र बोस, राजगुरू, सुखदेव इ. त्यांनीही आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या देशासाठी लढा दिला.
आपल्या भारत देशात अनेक दिग्गज खेळाडू देखील होऊन गेले आणि काही अजुनही आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत जसे ध्यानचंद, सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, मिल्खा सिंग, कपिल देव, इ. आपला भारत देश सर्व गोष्टीत पुढे आहे.
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यात महात्मा गांधींचे आणि वीर सैनिकांचे खूप योगदान होते. तेव्हापासून ते आतापर्यंत बरेच वर्ष ओलांडून गेले परंतु आपल्या भारताची शान अजुनही तशीच आहे. तीच संस्कृती, तेच दयाळू आणि प्रेमळ लोकं. भारतात एकूण २८ घटक राज्ये आहेत ज्यात छोटे मोठे शहरे, गावे आहेत आणि त्यात विविध प्रकारच्या जाती धर्माचे लोक निवास करतात. प्रत्येक राज्य कोणत्या ना कोणत्या गोष्टींनी प्रसिद्ध आहेत. आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून देखील ओळखला जातो. कारण भारतात एकूण 80% लोकं शेती करतात. “जय जवान जय किसान” हे आपल्या भारत देशाचे ब्रीदवाक्य आहे. शेतकरी म्हणजे आपल्या भारताची शान आहे जर शेतकरी आहे तर आपण जिवंत आहोत कारण तोच आपला अन्न देवता आहे त्यांच्यामुळेच आज सर्व लोकांची भूक भासते.
भारतात अनेक प्रकारचे लोक राहतात. जसे हिंदू, मुस्लिम, सिख, बौद्ध, जैन, फारसी, इ. आणि त्याचबरोबर काही बाहेर देशातील लोक देखील भारतात स्थायिक आहेत. प्रत्येक धर्माची भाषा ही वेगळी आहे. जसे हिंदी, मराठी, उर्दू, पंजाबी, पारशी, इ. वेगवेगळ्या भाषा आपल्याला भारतात अनुभवायला मिळतील. मुख्य म्हणजे सर्व लोक मिळून मिसळून राहतात आणि त्यांना आपल्या जाती धर्माच्या आधी आपण भारतीय आहोत याचा गर्व आहे. ऐतिहासिक स्थळांची तर विषयच वेगळा आहे. कारण प्राचीन काळातील स्मारके, गडकिल्ले जसे शिवनेरी किल्ला, सिंह गड, ताजमहल, इ. खूप प्रसिद्ध आहेत ज्यामुळे भारताची शान अजून वाढून गेली आहे. ऐतिहासिक मंदिरे देखील खूप आहेत जसे लक्ष्मी मंदिर, साई बाबा मंदिर, शप्तशृंगी गड, वणी गड, बिजासणी घाट, ई जे खूप बघण्यासारखे आहेत.
भारत देश विविध सणांनी नटलेला आहे आणि प्रत्येक सणांमध्ये काही ना काही गोष्ट आहे. दिवाळी, दसरा, होळी, मकर संक्रांत, राखी पौर्णिमा, आखाजी, ईद, ख्रिसमस इ. सण भारतात साजरे केले जातात. दिवाळीला लक्ष्मीपूजन, भाऊबीज सण येतात. भाऊबीज च्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि असे सहा सात दिवस दिवाळी मध्येच जातात. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पान वाटतात, त्यांना सोनं देखील म्हणतात. आणि रात्री रावणाला जाळतात. होळीच्या दिवशी होळीला जाळतात आणि पुढच्या दिवशी रंगपंचमी मनवतात. त्यात एकदुसऱ्याला रंग लावतात. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ वाटतात आणि सर्वजण जवळ येतात, गोड होतात. राखी पौर्णिमाला बहिण भावाला त्याच्या आवडती राखी बांधते आणि भाऊ बहिणीला सुंदरसे भेटवस्तू देतो. आखाजी ला पुरण पोळी चे जेवण असते आणि झाडाला झोका बांधून झोका खेळतात.
भारत देश गंगा, जमुना, तापी अश्या अनेक नद्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि अरबी समुद्रासाठी देखील प्रसिद्ध आहे. गंगा नदीला आपल्या देशात आईचे स्थान आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात देखील आपला भारत देश माघे नाही आहे. डॉक्टर ए. पी, जे अब्दुल कलाम आपल्या भारतातील खूप मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून देखील संबोधले जाते. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. त्यांना भरपूर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले कसे भारतरत्न, पद्मभूषण, इ. भारत हे बाहेरून देखील मजबूत आहे कारण जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले आहेत, तेव्हा तेव्हा भारताने त्यांवर मात केली आहे. आजच्या वेळेस भारत देशाची सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सुरक्षित आहे आणि आपल्याकडे शस्त्र देखील आहेत ज्यामुळे कोणताही देश आपल्यावर हल्ला करण्याच्या आधी विचारात पडून जातो आणि जवळपास खूप देश आपले मित्र बनले आहेत. त्यामुळे देखील त्यांच्यापासून आपणास भीती नाही. जर केव्हा आपल्यावर काही संकट आले तर आपला देश त्याला हिमतीने उत्तर देईल.
भारत देशाला भारतमाता देखील म्हटले जाते. कारण जशी एक आई आपल्या मुलाला सांभाळते तसेच भारतमाता सर्व भारत वासियांचा सांभाळ करते. भारत देशाला स्वच्छ ठेवणे, भष्टाचारापसून दूर करणे आणि प्रदूषण मुक्त करणे आपल्याच हातात आहे कारण जर आपण आपले विचार चांगले ठेवले तरच लोक त्यांचे विचार चांगले ठेवतील. आजकल तर भारत देशात सर्वजण नावाला भारत देश करतात पण कोणीच चांगल्या कामांसाठी पुढे येत नाही किंवा आपल्या स्वतःपासून सुरुवात करत नाहीत. त्यामुळे आधी आपण स्वतः सुरुवात करायला हवी आपल्याला बघून नक्कीच बाकीचे पण सुरुवात करतील.असा सर्व जगात भारी आपला भारत देश आहे आणि तो मला खूप प्रिय आहे.
आपण आपल्या देशाचे नक्कीच गुणगान गाऊया. जय हिंद ...! जय भारत ...!
इतर भाषणे : १) मी तिरंगा बोलतोय
15 august marathi bhashan | Swatantryadin Bhashan | 15 ऑगस्ट - मराठी भाषणे