व्हॉट्सअॅपचे 'पेमेंटस बॅकग्राऊंड' फिचर लाॅंच, पाठवा पैसे..!
new payment background feature on WhatsApp
तुम्ही व्हाट्सॲप अपडेट केले आहे का? व्हॉट्स अॅपवरुन आता नागरिकांना एकमेकांना पैसे पाठविण्याची सोय करण्यात आली आहे. कोणालाही पैसे पाठविताना त्यासोबत प्रत्येकाच्या काहीतरी भावना गुंतलेल्या असतात. मित्र, कुटुंबीयांना पैसे पाठविताना त्यास 'पर्सनल टच' देता यावा, यासाठी व्हॉट्स अॅपने एक नवे फिचर आणले आहे.WhatsApp new features | Curent Update
नवीन फिचरची वैशिष्ट्ये
- अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरता येईल.
- सध्या व्हॉट्स अॅपवर सात बॅकग्राउंड उपलब्ध आहेत. हॉलिडे, बर्थडे आणि ट्रॅव्हलिंग प्रसंगी वापरता येतील, अशा बॅकग्राऊंडचा समावेश आहे.
- रक्षाबंधनसारखे थीम-बेस्ड बॅकग्राउंडही फिचरमध्ये उपलब्ध आहे.
कसा करणार वापर..?
- व्हॉट्स अॅपवर नवीन पेमेंट करताना 'पेमेंट बॅकग्राउंड' निवडण्यासाठी 'Send Payment' स्क्रीनवर बॅकग्राउंड आयकॉनवर टॅप करा.
- तुमच्यासमोर बॅकग्राऊंडची यादी येईल, त्यातून पेमेंटला साजेशा बॅकग्राऊंडची निवड करा.
- बॅकग्राउंड सोबतच तुम्ही पेमेंटचे कारण किंवा शुभेच्छा लिहू शकता.
- पेमेंट केल्यावर रिसिव्हरला पेमेंट बॅकग्राउंडसह मिळेल.
- व्हॉट्स अॅपकडून नुकतेच भारतात हे फिचर सादर करण्यात आले. त्याचे नाव आहे, 'पेमेंटस बॅकग्राऊंड'..! व्हॉट्स अॅपने भारतात 'मनी ट्रान्सफर सेगमेंट'मध्ये हे नवे फिचर जोडले आहेत. व्हॉट्स अॅपवरुन कोणालाही पेमेंट करताना त्यासाेबत तुम्हाला एखादे साजेसे बॅकग्राउंड निवडता येणार आहे.
Tags
News