स्वाध्याय | SWADHYAY | Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana | ConveGenius
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र आयोजित स्वाध्याय उपक्रम चालू शैक्षणिक वर्षात देखील सुरू झालेला असून सध्या स्वाध्याय चा 6 वा आठवडा सुरु आहे. प्रत्येक स्वाध्याय हा दर शनिवारी त्या त्या इयत्तेचा अपडेट होत असतो. तो शनिवार अथवा रविवारी विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे. नवीन स्वाध्याय चाचणी अपडेट झाल्यानंतर आठवड्यात हा स्वाध्याय सोडवायचा आहे. चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थी पुढील वर्गात गेल्यामुळे त्याची इयत्ता बदलावी लागणार आहे. त्यासाठी शाळेचा ११ अंकी यु-डायस नंबर माहित असणे गरजेचे आहे. आपली शाळा योग्य सिलेक्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवायचा आहे. प्रत्येक विभागानुसार स्वाध्याय सोडवण्यासाठी मोबाईल क्रमांक हा वेगवेगळा असून त्याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
- अमरावती विभाग- स्वाध्याय सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक | स्वाध्याय | SWADHYAY whatsapp number
अमरावती विभागात अकोला,अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ हे जिल्हे असून या दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी 8595524417 या व्हाट्सॲप क्रमांक वर स्वाध्याय उपक्रम सोडवायचा आहे.दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी खालील लिंकवरून 8595524417 या मोबाईल क्रमांकाला Hello मेसेज करू शकता.
- नागपूर विभाग- स्वाध्याय सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक | स्वाध्याय | SWADHYAY whatsapp number
नागपूर विभागात भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया,नागपूर व वर्धा हे जिल्हे असून या दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी 8595524418 या व्हाट्सॲप क्रमांक वर स्वाध्याय उपक्रम सोडवायचा आहे.दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी खालील लिंकवरून 8595524418 या मोबाईल क्रमांकाला Hello मेसेज करू शकता.
औरंगाबाद विभागात औरंगाबाद,बीड, हिंगोली, जालना,लातूर,नांदेड,उस्मानाबाद व परभणी हे जिल्हे असून या दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी 8595524419 या व्हाट्सॲप क्रमांक वर स्वाध्याय उपक्रम सोडवायचा आहे.दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी खालील लिंकवरून 8595524419 या मोबाईल क्रमांकाला Hello मेसेज करू शकता.
- नाशिक विभाग- स्वाध्याय सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक | स्वाध्याय | SWADHYAY whatsapp number
नाशिक विभागात अहमदनगर,धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक हे जिल्हे असून या दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी 8595524517 या व्हाट्सॲप क्रमांक वर स्वाध्याय उपक्रम सोडवायचा आहे.दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी खालील लिंकवरून 8595524517 या मोबाईल क्रमांकाला Hello मेसेज करू शकता.
- कोकण विभाग- स्वाध्याय सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक | स्वाध्याय | SWADHYAY whatsapp number
कोकण विभागात मुंबई, मुंबई शहर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे हे जिल्हे असून या दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी 8595524518 या व्हाट्सॲप क्रमांक वर स्वाध्याय उपक्रम सोडवायचा आहे.दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी खालील लिंकवरून 8595524518 या मोबाईल क्रमांकाला Hello मेसेज करू शकता.
- पुणे विभाग- स्वाध्याय सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक | स्वाध्याय | SWADHYAY whatsapp number
पुणे विभागात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा व सोलापूर हे जिल्हे असून या दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी 8595524519 या व्हाट्सॲप क्रमांक वर स्वाध्याय उपक्रम सोडवायचा आहे.दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी खालील लिंकवरून 8595524519 या मोबाईल क्रमांकाला Hello मेसेज करू शकता.
- स्वाध्याय | SWADHYAY उपक्रमाबाबत आपल्याला जाणवणारे महत्वाचे प्रश्न
👀 दर आठवड्याला कोणत्या दिवशी स्वाध्याय नवीन दिला जातो?
👉 दर आठवड्याला शनिवारी स्वाध्याय नवीन दिला जातो.
👀 स्वाध्याय चाचणीमध्ये किती प्रश्न समाविष्ट असतात?
👉 स्वाध्याय चाचणीमध्ये फिक्स प्रश्नसंख्या नसून ७ ते १५ च्या दरम्यान प्रश्न समाविष्ट असतात.
👀 स्वाध्याय मध्ये नोंद केलेले विद्यार्थी डिलीट करण्याची सुविधा आहे काय?
👉 स्वाध्याय यंत्रणेत ही सुविधा अजून तरी दिलेली नाही.
- स्वाध्यायसाठी नोंदणी कशी कराल?
स्वाध्यायसाठी नोंद करण्याची पद्धत अतिशय सुलभ आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी कोणता स्वाध्याय क्रमांक आहे,याची माहिती वर दिलेली आहे.
सर्वप्रथम सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंकची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी.
आपल्या स्वाध्याय क्रमांकावर WhatsApp द्वारे “नमस्ते” किंवा “hello” असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.
सर्वप्रथम सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंकची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी.
आपल्या स्वाध्याय क्रमांकावर WhatsApp द्वारे “नमस्ते” किंवा “hello” असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.
- नवीन स्वाध्याय सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल युडायस कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात.
- पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
- आपल्या विभागाच्या लिंक ला टच करुन hello असा मेसेज पाठवा.
- त्यानंतर आपल्याला आपली मागील इयत्ता मधील नाव / नावे दिसून येतील.
- ज्या विद्यार्थ्यांचा स्वाध्याय सोडवायचा आहे त्याचा क्रमांक निवडा.
- यानंतर त्या विद्यार्थ्याची वर्तमान (सध्याची) इयत्ता निवडा.
- त्यानंतर शाळा बरोबर आहे का ते पहा जर बरोबर असेल तर 1 निवडा.
- शाळा बदललेली असल्यास 2 पर्याय निवडून नवीन शाळेचा udise कोड टाका. नंतर शाळेचे नाव येईल बरोबर असल्यास 1 निवडा व स्वाध्याय सोडवायला सुरवात करा.
आपापल्या येणाऱ्या समस्या आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा.
Tags
स्वाध्याय उपक्रम
मागिल वर्षाच्या विद्याथ्यांचा नंबर निवडला तरी नंबर send करताच १ ते ४ मधील उत्तर निवडा असस मॅसेज येत आहे .. इयत्ता बदलायची आहे पण Edit होत नाही ..
ReplyDeleteMadhyam nivadtana chikun Marathi zale semi English kase karave
ReplyDeleteअप्रतिम खूपच सुंदर पुढील कार्यास शुभेच्छा
ReplyDelete