५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
शिक्षक दिन विशेष कार्यक्रमांचे आयोजन
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१ मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते, यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय काय आहे?
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्डान वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्हान करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविपयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये झालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.
५ सप्टेंबर रोजी घ्यावयाचे कार्यक्रम :
भाषण / निबंध विषय -
पहिली ते पाचवी
सहावी ते आठवी
नववी ते बारावी
२. देशाच्या जडण घडणीमध्ये शिक्षकांचे योगदान
४.माझ्या शिक्षकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
फोटो अपलोड कोठे व कसे करावेत?
वरील कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यामांवर Facebook- @thxteacher, Twitter- @thxteacher, Instagram- @thankuteacher अशा प्रकारे टॅग करुन अपलोड करावेत. यावेळी खालील हॅॅशटॅॅग (#) चा वापर करावा.
#ThankATeacher
#ThankYouTeacher
#MyFavouriteTeacher
#MyTeacherMyHero
#ThankATeacher2021
बक्षीस काय आहे?
यामधील सर्वोत्तम असलेल्या कार्यक्रमापैकी “राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद” महाराष्ट्र
(scert) कडून जिल्हानिहाय व गटनिहाय तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. कोरोनाची परिस्थिती
सामान्य झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव होणार आहे.
नमुना भाषण व निबंध-
नमुना भाषण व निबंध लिंक खाली अपडेट होत आहेत.
इयत्ता पहिली ते पाचवी- शिक्षक दिन निबंध/भाषण
इयत्ता पहिली ते पाचवी | माझा आवडता शिक्षक |शिक्षक दिन | भाषण/निबंध | Maza Aavadata Shikshak | Teacher Day | Bhashan/Nibandh⓵भाषण विषय : माझा आवडता शिक्षक | Maza Aavadata Shikshak | इथे क्लिक करा
इयत्ता पहिली ते पाचवी | शिक्षक दिन |शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day | Bhashan/Nibandh
⓶भाषण विषय : शिक्षक दिन | Teacher Day | इथे क्लिक करा
इयत्ता पहिली ते पाचवी | मी शिक्षक झालो तर | Mi Shikshak Zalo Tar | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day | Bhashan/Nibandh
इयत्ता सहावी ते आठवी- शिक्षक दिन निबंध/भाषण
इयत्ता सहावी ते आठवी | माझा शिक्षक माझा प्रेरक | Maza Shikshak Maza Prerak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
इयत्ता सहावी ते आठवी | कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका | Kovid Kalavadhitil Shikshakanchi Bhumika | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
इयत्ता सहावी ते आठवी | माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान | Mazya Jivnatil Shikshakanche Sthan | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
इयत्ता सहावी ते आठवी | उपक्रमशील शिक्षक | Upkramshil Shikshak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
इयत्ता नववी ते बारावी - शिक्षक दिन निबंध/भाषण
इयत्ता नववी ते बारावी | आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका | Aadhunik Kalamadhye Shikshakanchi Badalaleli Bhumika | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
⓵ भाषण विषय : आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका | Aadhunik Kalamadhye Shikshakanchi Badalaleli Bhumika | इथे क्लिक करा
इयत्ता नववी ते बारावी | देशाच्या जडण-घडणीमध्ये शिक्षकांचे योगदान | Deshachya Jadanghadanimadhye Shikshakanche Yogdan | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
⓶ भाषण विषय : देशाच्या जडण-घडणीमध्ये शिक्षकांचे योगदान | Deshachya Jadanghadanimadhye Shikshakanche Yogdan | इथे क्लिक करा
इयत्ता नववी ते बारावी | शिक्षक : समाज परिवर्तनाचे माध्यम | Maza Shikshak Maza Prerak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
इयत्ता नववी ते बारावी | माझ्या शिक्षकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम | Mazya Shikshakacha Navinyapurn Upkram | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
⓸ भाषण विषय : माझ्या शिक्षकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम | Mazya Shikshakacha Navinyapurn Upkram | इथे क्लिक करा
राहिलेले विषय लवकरच अपडेट होतील.
Tags
शिक्षक दिन विशेष