कोरोना महामारी मुळे अजूनही शाळा बंद असून अनेक शाळांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू आहे. शासनाने 1 जुलैपासून 14 ऑगस्टपर्यंत सेतू अभ्यास घेतला होता. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा मागील अभ्यासक्रमावर आधारित उजळणी म्हणून सराव देखील झाला आहे. 15 ऑगस्टपासून नियमित अभ्यासक्रम त्या त्या वर्गाचा शिकवणे सुरू झाले असून प्रथम सत्र मध्ये जी पहिली आकारिक चाचणी होते, ती चाचणी ऑफलाईन घेण्यात कोरोना परिस्थितीमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. यासाठी आम्ही 'ओपन बुक टेस्ट' हा उपक्रम देखील हाती घेतला असून या उपक्रमाला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयावर 20 गुणांची चाचणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्या चाचणी ची प्रिंट काढून विद्यार्थ्यांचा ऑफलाईन देखील सराव होत आहे. उद्देश हाच आहे की- शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे व सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थी आनंददायी पद्धतीने शिकला पाहिजे.
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची इयत्तेनुसार आम्ही सर्व विषयांची एकत्रित 100 गुणांची आकारिक चाचणी प्रश्नमंजुषा स्वरूपात घेत आहोत. यामध्ये एकूण 50 प्रश्न असतील. विशेष म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहोत.
इयत्ता सातवी | प्रश्नमंजुषा चाचणी | कोण बनेल टेस्ट टाॅपर?
नवीन शैक्षणिक व्हिडीओंंसाठी खालील गुरुमाऊली चॅॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन ठेवा.
कोण बनेल टेस्ट टॉपर? प्रश्नमंजुषा
या उपक्रमाचे स्वरूप काय आहे हे जाणून घेऊया खालील मुद्यावरून...
- सदरील प्रश्नमंजुषा कोणत्या इयत्तेसाठी होणार आहे?
"कोण बनेल टेस्ट टाॅपर?" सदरील प्रश्न मंजूषा ही इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार असून प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी प्रश्नमंजुषा असेल. प्रत्येक इयत्तेची प्रश्नमंजुषा सोडवण्याची लिंक वेगळी असेल. खालील इयत्तेच्या बटणाला क्लिक करून चाचणी सोडवता येईल.
- प्रत्येक प्रश्नमंजुषा मध्ये एकूण किती प्रश्नांचा समावेश आहे?
प्रत्येक इयत्तेच्या "कोण बनेल टेस्ट टाॅपर?" प्रश्नमंजुषा मध्ये एकूण 50 प्रश्न समाविष्ट असून प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी आहे. तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवून चाचणी submit लागेल. शेवटी View Score ला क्लिक करून तुम्हाला किती गुण मिळाले हे देखील समजेल.
- प्रमाणपत्र कोणाला मिळणार आहे?
"कोण बनेल टेस्ट टाॅपर?" प्रश्नमंजुषा स्वरूपात चाचणी देण्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने घटकांचे आकलन होणे हे अपेक्षित आहे. आपण 100 पैकी 100 गुण मिळेपर्यंत देखील सराव करू शकता. जरी नाही मिळाले तरीही आम्ही सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहोत.
- प्रमाणपत्र डाऊनलोड करा -
कोण बनेल टेस्ट टाॅपर? स्पर्धेचे प्रमाणपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. सर्च बॉक्स मध्ये तुमचे नाव टाकून नाव सर्च करा. तुमच्या नावासमोरील डाऊनलोड बटणावर क्लिक करून प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्या. 24 सप्टेंबर ते १० ऑक्टोबर रोजी सहभागी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. तुमच्या नावासमोरील डाऊनलोड बटणावर क्लिक करून डाऊनलोड करून घेऊ शकता.
ज्या विद्यार्थ्यांनी अजून चाचणी सोडवलेली नाही, ते विद्यार्थी प्रश्नमंजुषा सोडवू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांनी अजून चाचणी सोडवलेली नाही, ते विद्यार्थी प्रश्नमंजुषा सोडवू शकतात.
इयत्ता सातवी | प्रश्नमंजुषा चाचणी | कोण बनेल टेस्ट टाॅपर?
कोण बनेल टेस्ट टाॅपर? चाचणी घेण्यासाठी मुलांना पोस्ट कशी पाठवाल?
पहिली ते सातवीच्या ग्रुपवर पाठवायच्या पोस्ट खाली दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या बटणाला क्लिक केल्यावर पोस्ट कॉपी (Copy) होईल. Whatsapp उघडून ग्रुपमध्ये फक्त पेस्ट (Paste) करा.