वाचन प्रेरणा दिन | 15 ऑक्टोबर | स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जन्मदिवस साजरा करणेबाबत | शासन परिपत्रक | Vachan Prerna Din
शासन परिपत्रक ची माहिती सविस्तरपणे खाली दिलेली आहे.
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निर्णयास अनुसरुन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने यापूर्वी संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या होत्या. सध्याच्या कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर या वर्षी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे "वाचन प्रेरणा दिन" कार्यक्रम साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था/मंडळ, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी देखील विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
वाचन प्रेरणा दिन साजरा कसा करावा?
वाचन प्रेरणा दिन | 15 ऑक्टोबर | स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जन्मदिवस साजरा करणेबाबत | शासन परिपत्रक | Vachan Prerna Din
याबाबत दिलेल्या सुचना खालीलप्रमाणे आहेत.
- १. ऑनलाईन कार्यक्रम/चर्चासत्रे/प्रशिक्षण ही कोविडच्या पार्श्वभूमीवर काळाची गरज आहे. ही बाब लक्षात घेता वाचन संस्कृती वाढीस लागण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावे.
- २. जिथे प्रत्यक्षरीत्या कार्यक्रम करणे शक्य आहे तिथे केंद्र शासन/राज्य शासन यांनी आखून दिलेल्या कोविड मार्गदर्शक कि तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
- ३. “वाचन संस्कृती” जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र, कुटुंबातील सदस्य इत्यादींना किमान एक पुस्तक पीडीएफ स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने पाठवून त्यांना वाचनास प्रोत्साहन द्यावे.
- ४. व्हॉटसअप (WhatsApp), इंटरनेट (Internet), फेसबुक(Facebook), ट्विटर(Twitter) अशा प्रकारच्या सामाजिक प्रसार माध्यमातून वाचन संस्कृती वृध्दींगत होईल /वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारीत करावेत.
- ५. मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी डिजीटल माध्यमाचा जास्तीत जास्त वापर करुन मराठीतील साहित्य स्वयंस्फुतीने वाचकाना पाठवावे.
वाचन प्रेरणा दिन | 15 ऑक्टोबर | स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जन्मदिवस साजरा करणेबाबत | शासन परिपत्रक | Vachan Prerna Din
- ६. सर्व संस्थांनी सोडल मीडियावर "मराठी वाचन कट्टा ' निर्मिती करावी.
- ७. “वाचन संस्कृती” वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांना मराठी भाषेशी संलग्न रोजगाराच्या संधीची माहिती या दृष्टीने रोजगारभिमुख चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे. उदा. व्यवसायिक लेखक कसे बनावे, अनुवाद कसा करावा,संहिता लेखन, गीत लेखन इत्यादी.
- ८. सर्व संस्थांनी आपल्या स्तरावर मराठी डिजिटल साहित्य संमेलनाचे आयोजन करावे.
- ९. विकीपीडीया सारख्या माध्यमावर मराठीत जास्तीत जास्त लेखन व्हावे याकरीता यासंबधीच्या कार्यशाळा आयोजीत करण्यात याव्यात.
- १०.(सर्व क्षेत्रीय कार्यलये) यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने मराठी प्रचार/प्रसार/वाचन संस्कृतीच्या विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे.
- ११.मराठी अभिजात दर्जाबाबत सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी महाराष्ट्र राज्य सस्कृती मंडळाच्या समन्वयाने विविध कार्यक्रमाचे र्यक्रमाचे आयोजन करावे.
सदर कार्यक्रम साजरा करताना कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन/राज्य शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
वाचन प्रेरणा दिन | 15 ऑक्टोबर | स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जन्मदिवस साजरा करणेबाबत | शासन परिपत्रक | Vachan Prerna Din
वाचन प्रेरणा दिन महत्व :
दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे.
दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. नितळ मन आणि दिलदार स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य होते. देशाच्या युवा पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल, हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. डॉ. कलाम नेहमी म्हणत असत की, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे.
शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण होण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे. शाळांमध्ये दर आठवड्यातील एक तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवणे, शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये वाचन कट्टा तयार करणे यासारखे उपक्रमही यानिमित्ताने हाती घेण्यात येणार आहेत. या दिनाच्या निमित्ताने शाळांनी इनोवेटिव्ह फंडामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तके खरेदी करून वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये वाचनाचे महत्व पटवून देण्यासाठी साहित्यिकांमार्फत मार्गदर्शन करण्यात यावे. वाचन दिनाच्या निमित्ताने त्या दिवसातील एक तास वाचनासाठी देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनच जणू या दिनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याशिवाय वाचन दिन अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी सोशल मिडीयाचा वापरही करण्यात यावा. तसेच साहित्यिक, मान्यवर व्यक्तींनी वाचनाचे महत्व सांगणारे ट्विट करावे, असे आवाहनही शालेय शिक्षण मंत्री यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच हा दिवस आपण सर्वांनी मिळून ‘नो गॅझेट डे’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तकांचे वाचन या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दूरदृष्टी, शक्तीशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील, या दृष्टीकोनातून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाणार आहे. मुळातच विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडण्यासाठी आणि भाषाविकास यासाठी आवश्यक आहे. मुळातच वाचन संस्कृती ही व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम करीत असते. म्हणून शाळा आणि महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करणे, समाज सहभागातून या कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करुन शाळेत पुस्तकपेढी तयार करणे, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करणे, एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबविणे, प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका विद्यार्थ्याला किंवा शाळेला विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरुप होतील अशी पुस्तके भेट देणे, विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करणे, चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्रांचे आयोजन करणे, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे, परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयीची माहिती देणे, पुस्तकांचे वाटप करुन ‘वाचक दिन’ आणि ‘अध्यापन दिन’ साजरा करणे, विद्यार्थ्यांचे गट करुन विविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणे, शाळांनी पुढाकार घेवून ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे, असे विविध उपक्रम आणि याव्यतिरिक्त देखील विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत.
चला तर मग, काव्यवाचन, अभिवाचन, नो गॅझेट डे, वाचन कट्टा, समूह वाचन इत्यादी उपक्रमातून वाचक प्रेरणा दिन अधिकाधिक उत्सफूर्तपणे साजरा होण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी होऊया...
काही पर्यायांमध्ये गोंधळ वाटतोय.
ReplyDelete