५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियान अंतर्गत उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून शिक्षकदिनादिवशी ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका भाषण / निबंध | Aadhunik Kalamadhye Shikshakanchi Badalaleli Bhumika | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका / निबंध | Aadhunik Kalamadhye Shikshakanchi Badalaleli Bhumika
आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका भाषण / निबंध | Aadhunik Kalamadhye Shikshakanchi Badalaleli Bhumika | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
निबंध/भाषण- 'आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका'
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेचा केंद्रस्थानी शिक्षकच असतो. शिक्षका बद्दल समाजामध्ये कायमचे आदराचे आणि मानसन्मानाचे स्थान असते. विद्यार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. जगात कुठेही गुरु आणि शिक्षकांचा आदर केला जातो. काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाहीत, तर त्यांच्या जीवनात ही स्थित्यंतरे घडवून आणतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने मुलांनी उराशी बाळगलेली असतात, ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते. आधुनिक काळामध्ये शिक्षकाची ही भूमिका बदलत चालली आहे. शिक्षण प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून काळानुसार शिक्षण प्रक्रियेत देखील बदल होत असतात. त्यानुसार आपल्यात देखील काळानुरूप बदल घडवून आणणे अपेक्षित असते. पारंपारिक शिक्षण पद्धती व आधुनिक शिक्षण पद्धती याचा विचार केल्यास सध्याच्या शिक्षण पद्धतीत खूप बदल घडून आलेले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आधुनिक शिक्षण पद्धती उदयास आलेली आहे. खडू-फळा ऐवजी फळ्याची जागा सध्या काही ठिकाणी प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड ने घेतलेली आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. विविध ॲप्स ऑनलाइन शिक्षण यावर भर दिसत आहे. वास्तविक हे बदल परिस्थितीनुसार होत असून ते स्वीकारण्याची मानसिकता देखील शिक्षकांची असली पाहिजे. उदा. सध्याची परिस्थिती पाहता तोरणा प्रादुर्भावामुळे अनेक शाळा बंद आहेत. अशा वेळी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय उरत नाही. प्रत्येक शिक्षकाने आपली मानसिकता बदलून ऑनलाइन शिक्षण कसे द्यावे, विद्यार्थ्यांशी कसे कनेक्टर राहावे, ॲप्स चा वापर कसा करावा, व्हिडिओ निर्मिती कशी करावी, या सर्व गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या व करूनही दाखवल्या. काही नवीन बदल स्वीकारले. शिकण्याची मानसिकता तयार करून प्रत्यक्ष अध्यापन ही सुरू केले. म्हणजेच बदलत्या परिस्थितीनुसार नवीन बदल स्वीकारून शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवणे ही शिक्षकाची खरी कसोटी इथे दिसून येते. आधुनिक काळात शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असताना चालू परिस्थितीप्रमाणे प्रत्येक शिक्षकाला अपडेट राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या बाहेरील जग दाखवून त्यांच्या सर्जनशीलतेचा विकास करण्याच्या वाटा खुल्या केल्या पाहिजेत. दर्जेदार शिक्षण याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शिक्षण प्रक्रिया कसे प्रभावी राबवता येईल याबाबत विचार व्हायला हवा. अशैक्षणिक कामातून ज्यावेळी शिक्षकांची मुक्तता होईल त्यावेळी विद्यार्थ्यांशी अधिक संपर्कात राहून शिक्षक आणखी दर्जेदार शिक्षण देऊ शकतो. त्यामुळे भविष्यात या बाबींचा देखील विचार व्हायला हवा. कारण शिक्षक जितका विद्यार्थ्यांची संपर्कात राहील तितका विद्यार्थी समृद्ध होत असतो. दर्जेदार शिक्षणातून दर्जेदार आऊटपुट तेव्हाच निघेल जेव्हा शिक्षकाला फक्त शिकवण्याचीच जबाबदारी दिली जाईल. इतर अशैक्षणिक कामातून मुक्तता मिळण्यासाठी एक वेगळी सिस्टिम बनविणे काळाची गरज आहे. नवीन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सुजाण व समृद्ध घडविण्यासाठी प्रत्येक शिक्षक हा जीव ओतून काम करत असतो. त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व समाजाने लक्षात घेतले पाहिजे. शिक्षकांचा आदर केला पाहिजे. ज्या देशात शिक्षकांचा आदर केला जातो त्या देशातील भावी पिढी ही सुजाण व सुसंस्कृत घडत असते हे सत्य आहे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, आधुनिक काळामध्ये शिक्षकांची भूमिका ही बदललेली असून शिक्षण हे ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन भागात विभागलेले आहे. परिस्थितीनुसार दोन्ही प्रकारे शिक्षण प्रभावी देण्याची जबाबदारी शिक्षकांची असली पाहिजे. काळानुसार शिक्षक व शिक्षणाची व्याख्या देखील बदलत चालली आहे._@गुरुमाऊली
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेचा केंद्रस्थानी शिक्षकच असतो. शिक्षका बद्दल समाजामध्ये कायमचे आदराचे आणि मानसन्मानाचे स्थान असते. विद्यार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. जगात कुठेही गुरु आणि शिक्षकांचा आदर केला जातो. काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाहीत, तर त्यांच्या जीवनात ही स्थित्यंतरे घडवून आणतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने मुलांनी उराशी बाळगलेली असतात, ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते.
आधुनिक काळामध्ये शिक्षकाची ही भूमिका बदलत चालली आहे. शिक्षण प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून काळानुसार शिक्षण प्रक्रियेत देखील बदल होत असतात. त्यानुसार आपल्यात देखील काळानुरूप बदल घडवून आणणे अपेक्षित असते. पारंपारिक शिक्षण पद्धती व आधुनिक शिक्षण पद्धती याचा विचार केल्यास सध्याच्या शिक्षण पद्धतीत खूप बदल घडून आलेले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आधुनिक शिक्षण पद्धती उदयास आलेली आहे. खडू-फळा ऐवजी फळ्याची जागा सध्या काही ठिकाणी प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड ने घेतलेली आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. विविध ॲप्स ऑनलाइन शिक्षण यावर भर दिसत आहे. वास्तविक हे बदल परिस्थितीनुसार होत असून ते स्वीकारण्याची मानसिकता देखील शिक्षकांची असली पाहिजे. उदा. सध्याची परिस्थिती पाहता तोरणा प्रादुर्भावामुळे अनेक शाळा बंद आहेत. अशा वेळी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय उरत नाही. प्रत्येक शिक्षकाने आपली मानसिकता बदलून ऑनलाइन शिक्षण कसे द्यावे, विद्यार्थ्यांशी कसे कनेक्टर राहावे, ॲप्स चा वापर कसा करावा, व्हिडिओ निर्मिती कशी करावी, या सर्व गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या व करूनही दाखवल्या. काही नवीन बदल स्वीकारले. शिकण्याची मानसिकता तयार करून प्रत्यक्ष अध्यापन ही सुरू केले. म्हणजेच बदलत्या परिस्थितीनुसार नवीन बदल स्वीकारून शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवणे ही शिक्षकाची खरी कसोटी इथे दिसून येते.
आधुनिक काळात शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असताना चालू परिस्थितीप्रमाणे प्रत्येक शिक्षकाला अपडेट राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या बाहेरील जग दाखवून त्यांच्या सर्जनशीलतेचा विकास करण्याच्या वाटा खुल्या केल्या पाहिजेत. दर्जेदार शिक्षण याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शिक्षण प्रक्रिया कसे प्रभावी राबवता येईल याबाबत विचार व्हायला हवा.
अशैक्षणिक कामातून ज्यावेळी शिक्षकांची मुक्तता होईल त्यावेळी विद्यार्थ्यांशी अधिक संपर्कात राहून शिक्षक आणखी दर्जेदार शिक्षण देऊ शकतो. त्यामुळे भविष्यात या बाबींचा देखील विचार व्हायला हवा. कारण शिक्षक जितका विद्यार्थ्यांची संपर्कात राहील तितका विद्यार्थी समृद्ध होत असतो. दर्जेदार शिक्षणातून दर्जेदार आऊटपुट तेव्हाच निघेल जेव्हा शिक्षकाला फक्त शिकवण्याचीच जबाबदारी दिली जाईल. इतर अशैक्षणिक कामातून मुक्तता मिळण्यासाठी एक वेगळी सिस्टिम बनविणे काळाची गरज आहे.
नवीन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सुजाण व समृद्ध घडविण्यासाठी प्रत्येक शिक्षक हा जीव ओतून काम करत असतो. त्यामुळे शिक्षकांचे महत्त्व समाजाने लक्षात घेतले पाहिजे. शिक्षकांचा आदर केला पाहिजे. ज्या देशात शिक्षकांचा आदर केला जातो त्या देशातील भावी पिढी ही सुजाण व सुसंस्कृत घडत असते हे सत्य आहे.
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, आधुनिक काळामध्ये शिक्षकांची भूमिका ही बदललेली असून शिक्षण हे ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन भागात विभागलेले आहे. परिस्थितीनुसार दोन्ही प्रकारे शिक्षण प्रभावी देण्याची जबाबदारी शिक्षकांची असली पाहिजे. काळानुसार शिक्षक व शिक्षणाची व्याख्या देखील बदलत चालली आहे.
आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका भाषण / निबंध | Aadhunik Kalamadhye Shikshakanchi Badalaleli Bhumika | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
शासन निर्णय काय आहे?
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्डान वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्हान करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविपयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये झालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.