प्रस्तुत पोस्टमध्ये गणेश चतुर्थी निमित्त विविध आरती संग्रह संकलित केलेला आहे.
शंकराची आरती | लवथवती विक्राळा | आरती संग्रह
शंकराची आरती | लवथवती विक्राळा | आरती संग्रह
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥
शंकराची आरती | लवथवती विक्राळा | आरती संग्रह | Lavthavti Vikrala
दररोजच्या महत्वाच्या आरत्या संग्रह
- गणपतीची आरती | सुखकर्ता दु:खहर्ता | आरती संग्रह | Sukhakarta Dukhaharta
- विठोबाची आरती | युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | आरती संग्रह | Yuge Atthavis Vitevari Ubha
- शंकराची आरती | लवथवती विक्राळा | आरती संग्रह | Lavthavti Vikrala
- देवीची आरती | दुर्गे दुर्घट भारी | आरती संग्रह | Durghe Durghat Bhari
- दत्ताची आरती | त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा | आरती संग्रह | Trigunatmak Traimurti Datt Ha Jana
- विठोबाची आरती | येई हो विठ्ठले माझे माऊली ये | आरती संग्रह | Yei Ho Vitthale Maze Mauli Ye
- ज्ञानदेवाची आरती | आरती ज्ञानराजा | आरती संग्रह | Aarti Dnyanraja
- तुकारामांची आरती | आरती तुकारामा | आरती संग्रह | Aarti Tukarama
- घालिन लोटांगण | आरती संग्रह | Ghalin Lotangan
Tags
Aarti Sangrah