५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियान अंतर्गत उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून शिक्षकदिनादिवशी ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका भाषण / निबंध | Covid Kalavadhitil Shikshakachi Bhumika | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका भाषण / निबंध | Covid Kalavadhitil Shikshakachi Bhumika
कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका भाषण / निबंध | Covid Kalavadhitil Shikshakachi Bhumika | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
निबंध/भाषण- 'कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका'
गेली दोन वर्ष कोरोना परिस्थितीचे सावट जगभर पसरले असून शाळा बंद आहेत. करुणा चे वाढते प्रमाण पाहून अजूनही शाळा सुरू केलेल्या नाहीत. सर्व विद्यार्थी आपापल्या घरात आहेत. शाळा बंद असल्याने त्यांचे घरी बसूनच शिक्षण सुरू आहे. यामध्ये शिक्षण प्रक्रिया सतत सुरू राहावे या उद्देशाने या कोरोना कालावधीत शिक्षकाची भूमिका महत्वाची ठरत आहे. जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे शिक्षक वर्ग आपापल्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन ऑफलाइनरित्या शिक्षण देत असून शिक्षणात खंड न पडता ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे. अनेक पालकांनाही शिक्षकांचे महत्त्व या कोरोना काळात दिसून आले. विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांचा अभ्यास या सर्व बाबी पाहत असताना सध्या पालक वर्ग विद्यार्थ्यांच्या खूप जवळ असून यामध्ये पालकांची कसरत झालेली दिसून येते. आपले मूल सांभाळत असताना त्यांची दमछाक झालेली दिसते. शाळेच्या चार खोलीत शिकवलेले ज्ञान व घरात शिकवलेले ज्ञान यात खूप अंतर असते. एखाद्या शिक्षकाचा मुलगा देखील शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांवरच विश्वास ठेवत असतो. त्यामुळे समाजात गुरूंचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते. सध्याच्या कोविल परिस्थितीमध्ये ही शिक्षकाची भूमिका खूपच बदललेली दिसून येते. शासनाकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन रित्या सुरु असून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिक्षक करीत आहेत. जिथे कोरोना चा संसर्ग जास्त आहे तिथे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. विविध सोशल माध्यमांच्या द्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासून त्यांच्या अडचणी सोडविल्या जातात. शेकडो शिक्षकांनी बनवलेला पीडीएफ स्वरूपातील अभ्यास असेल किंवा युट्यूब व्हिडिओ असतील अशा विविध संदर्भ साहित्यांचा आधार घेत शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवत आहेत. जिथे कोरोना चा प्रादुर्भाव कमी आहे तिथे पारावरच्या शाळा, गल्ली मित्र, स्वाध्याय अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत मास्क वापरून त्यांच्यापर्यंत पोहोचून शिक्षण देत आहेत. काही ठिकाणी शाळा देखील सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या उद्देशाने शासनाच्या आदेशाचा विचार न करता पालकांच्या संमतीने अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांशी तळमळीने शिक्षण सुरू आहे. आपला विद्यार्थी घडला पाहिजे हा उद्देश समोर ठेवून आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक शिक्षक तळमळीने व आत्मीयतेने या कोरोना परिस्थितीशी सामना करत विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवत आहेत. या कोवीड कालावधीत शिक्षकांची भूमिका का महत्वाची आहे? सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये शालेय वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. यामध्ये आरोग्य हा महत्त्वाचा विषय असून त्यासोबत दररोजचा अभ्यास पूर्ण करणे व अभ्यासात सातत्य ठेवणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी असून शिक्षक त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय हे शक्य होणार नाही. त्यामुळे विविध माध्यमांचा वापर करून तसेच विविध उपक्रमांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांशी कनेक्ट राहून शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जिथे कोरोनाचा संसर्ग अजिबात नाही तिथे पालकांचे मतपरिवर्तन करून त्यांच्यात धाडस निर्माण करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समोर शिक्षण देण्यास सुरुवात केली पाहिजे. या कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थी अनेक पावले मागे गेली असून त्यांच्यातील भीती नाहीशी करून शैक्षणिक वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे. नियमित मास्क वापरणे, स्वच्छते संदर्भात संदेश लक्षात ठेवणे व कृतीत आणणे, योग्य अंतर ठेवणे, अशा अनेक नवीन गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात या परिस्थितीला तोंड देण्यासाठी धाडस निर्माण केले पाहिजे. कोरोना काळातील शिक्षकाची हीच महत्त्वाची जबाबदारी असून कोणत्याही विद्यार्थ्याला संसर्ग न होण्यासाठी विशेष काळजी घेऊन त्यांच्यापर्यंत ऑनलाइन ऑफलाइन शिक्षण प्रभावीपणे पोहोचवणे गरजेचे आहे. भविष्यात ही परिस्थिती किती दिवस राहील हे माहीत नाही पण नक्कीच शिक्षकाची व शिक्षणाची व्याख्या मात्र बदलत चालली आहे हे नक्की...._@ गुरुमाऊली
कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका भाषण / निबंध | Covid Kalavadhitil Shikshakachi Bhumika | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
शासन निर्णय काय आहे?
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्डान वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्हान करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविपयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये झालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.