How to become a lawyer? | तुम्हाला वकील व्हायचे आहे का? | वकील मराठी माहिती | lawyer information in marathi
lawyer information in marathi | वकील मराठी माहिती
प्रत्येकाचे एक विशिष्ट ध्येय असते, जे प्राप्त करण्यासाठी शिक्षणातून पुढे जायचे असते. आपल्याला चांगली नोकरी असावी असे प्रत्येकाला वाटते. यासाठी काही जण शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहतात तर काही डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहतात तर काही इंजिनियर तर काही लोकांचे स्वप्न एक प्रोफेशनल वकील बनण्याचे असते. आजच्या जगात एक यशस्वी वकील बनणे खूप मोठी गोष्ट आहे. परंतु फक्त कायद्याचे शिक्षण मिळवून तुम्ही वकील बनणार नाहीत. यासाठी तुम्हाला व्यावहारिक ज्ञानाची आवश्यकता आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी कायद्याचे शिक्षण घेतात परंतु त्यातून फक्त 20 टक्के विद्यार्थी प्रशिक्षणासाठी जातात. आजच्या या लेखात आपण वकील कसे बनावे (lawyer in marathi) या बद्दल माहिती प्राप्त करणार आहोत.
awyer information in marathi | वकील मराठी माहिती | advocate lawyer meaning in marathi
एक यशस्वी वकील बनण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणून सर्वात आधी तुम्हाला कायद्याचे शिक्षण घ्यावे लागेल. भारतात प्रसिद्ध असलेले LLB शिक्षण प्रत्येक वकील बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला घ्यावे लागते.
एल.एल.बी. (LLB) काय असते ?
एल.एल.बी चा इंग्रजी फुलफॉर्म लेगम बॅक्लॅरियस (Legum Baccalaureus) असा होतो. इंग्रजीत याचा अर्थ 'बॅचलर ऑफ लॉ' असाही केला जातो. LLB ही कायद्याची बॅचलर डिग्री असते. वकिली क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी LLB अत्यंत महत्त्वाचे शिक्षण आहे.
LLB मध्ये तुम्हाला भारतीय कायद्यांचे संपूर्ण शिक्षण दिले जाते. LLB करून तुम्ही एक प्रोफेशनल वकील बनू शकतात किंवा इतर क्षेत्रात ही जाऊ शकतात. LLB नंतर असणाऱ्या करिअर ऑप्शन बद्दल आपण पुढे पाहूया. परंतु त्या आधी LLB करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहुया.
LLB कोर्स चे प्रकार
LLB कोर्स चे दोन प्रकार असतात एक 5 वर्षाचा आणि दुसरा 3 वर्षाचा. जर तुम्ही 12 वी नंतर सरळ कायद्यांचे शिक्षण प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला पाच वर्षाचा LLB कोर्स करावा लागेल. याशिवाय जर तुम्ही 3 वर्षाचा BA LLB कोर्स करू इच्छिता तर त्यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण करावे लागेल. LLB चे शिक्षण घेण्यासाठी लागणारी योग्यता पुढीलप्रमाणे आहे.
LLB कोर्स साठीची पात्रता
जर तुम्ही बारावी नंतर एल एल बी करू इच्छिता तर तुमच्याकडे 12 वी पास चे मार्कशीट असायला हवे.
बारावी मध्ये तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स असायला हवेत. 50 टक्क्यांपेक्षा कमी मार्क मिळवणारे विद्यार्थी LLB साठी अपात्र राहतील.
LLB करणार्या विद्यार्थ्याची जास्तीतजास्त वयोमर्यादा 35 वर्षे आहे.
जर तुम्ही BA LLB चा तीन वर्षाचा कोर्स करू इच्छिता तर तुमचे शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण असायला हवे.
ग्रॅज्युएशन नंतर बी ए एल. एल. बी. करणार्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात कमीत कमी 45 टक्के असायला हवेत.
BA LLB करण्यासाठीची वयोमर्यादा बावीस वर्षे आहे.
How to become a lawyer? | तुम्हाला वकील व्हायचे आहे का? | lawyer information in marathi
वकील बनण्यासाठी च्या 4 प्रमुख पायर्या पुढील प्रमाणे आहेत.
- 12 वी पर्यंतचे शिक्षण आवश्यक आहेत. यामध्ये आर्ट्स साईड मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष फायदा मिळेल. कारण आर्ट्स मध्ये लॉ शी संबंधित विषय शिकवले जातात.
- 12 वी नंतर कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. भारतात प्रसिद्ध असलेली CLAT परीक्षा देऊन तुम्ही कोणत्याही एलएलबी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात.
- LLB चे शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला इंटर्नशिप करावी लागेल. या दरम्यान तुम्हाला कोर्ट कचेरीच्या संपूर्ण प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाईल.
- स्टेट बार काऊन्सिल मध्ये नावनोंदणी : इंटर्नशिप पूर्ण केल्यावर तुम्हाला आपल्या राज्याच्या स्टेट बार काऊन्सिल मध्ये जाऊन आपली नाव नोंदणी करावी लागते. यानंतर ऑल इंडिया बार काऊन्सिल कढून घेण्यात येणारी परीक्षा AIBE पास करावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही संपूर्ण राज्यात कोठेही वकिली करू शकतात.
career options after LLB in marathi | LLB पूर्ण केल्यावर जॉब आणि करियर
एक वकील हा प्रायव्हेट व सरकारी दोघी क्षेत्रात जॉब करू शकतो. अत्याधिक वकील LLB पूर्ण केल्यावर प्रोफेशनल वकील म्हणून काम करणे पसंद करतात. परंतु एक चांगला वकील याशिवायही अनेक करियर ऑप्शन ची निवड करू शकतो.
1) एन्वॉयरनमेंटल लॉयर :
2) सायबर लॉ वकील :
3) पेटंट आणि कॉपीराइट लॉयर :
वकील कसे बनावे या बद्दल ची मराठी माहिती आपल्याला समजली असेल. धन्यवाद..!