५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियान अंतर्गत उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून शिक्षकदिनादिवशी ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
माझा शिक्षक माझा प्रेरक भाषण / निबंध | Maza Shikshak Maza Prerak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
माझा शिक्षक माझा प्रेरक भाषण / निबंध | Maza Shikshak Maza Prerak
माझा शिक्षक माझा प्रेरक भाषण / निबंध | Maza Shikshak Maza Prerak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
निबंध/भाषण- 'माझा शिक्षक माझा प्रेरक'
कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक गोष्टी शिकवत असतात. शिक्षकाद्वारे मिळालेली शिक्षा विद्यार्थ्याचे आयुष्य बदलून टाकते. एक आदर्श शिक्षक स्वतः आधी आपल्या विद्यार्थ्याचा भविष्याचा विचार करतो. शाळेत प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याला समान असतात कारण प्रत्येक शिक्षक त्यांना ज्ञान देण्याचे काम करतात. परंतु केव्हा केव्हा एखादे शिक्षक विद्यार्थ्याचे अती प्रिय बनून जातात. एखादे शिक्षक अधिक आवडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. माझे सुद्धा एक आवडते शिक्षक आहेत, मी त्यांचा स्वभाव आणि शैक्षणिक उत्कृष्टतेमुळे अती प्रभावित झालो आहे. ज्या शिक्षकांनी मला प्रभावित केले आहे त्यांचे नाव आहे .......... हे सर/मॅडम उत्कृष्ट शिक्षक आहेत. ते आमच्या शाळेत ....... विषय शिकवतात. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ते प्रिय आहेत. सर्वच विद्यार्थी त्यांची प्रशंसा व सन्मान करतात. ...... सर/मॅडम यांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते सर्व विद्यार्थ्यांना समान व्यवहार देतात आणि सर्व विद्यार्थ्यांशी विनम्रता आणि प्रेमळपणे बोलतात. या शिवाय त्यांना शिस्त अतिप्रिय आहे जर कोण्या विद्यार्थ्याने मस्ती केली किंवा होमवर्क पूर्ण केला नाही तर ...... सर/मॅडम त्याला शिक्षा पण करतात. एवढे असूनही मला ...... सर/मॅडम खूप आवडतात. एक शिक्षक हा कुंभार प्रमाणे असतो. कुंभार ज्या प्रमाणे माती ची भांडे बनवताना त्याला एका हाताने सांभाळून दुसऱ्या हाताने आकार देतो, त्याच प्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देतात. शिक्षक शिवाय चांगला समाज तयार होणे असंभव आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या फक्त प्रिय शिक्षक नाही तर सर्वच शिक्षकांना समान सम्मान द्यायला हवा. शिक्षक हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे व्यक्ती असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत "गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा" अशा पद्धतीने शिक्षकाला देवाचा दर्जा दिला गेला आहे. शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षित करून चांगला नागरिक बनवतात. शिक्षक विद्यार्थ्याचे चरित्र, सवयी आणि करिअर घडवितात. एक शिक्षकच आपल्या विद्यार्थ्यामध्ये विचार करण्याची क्षमता विकसित करतो. आणि त्यांना आपल्या जीवनातील ध्येय प्राप्त करण्यात मदत करतो. प्रत्येक शिक्षकाची हीच इच्छा असते की त्यांचे विद्यार्थी जास्तीत जास्त प्रगती करून आपल्या शिक्षकांची मान अभिमानाने उंच करो. ...... सर/मॅडम आम्हाला फक्त पुस्तकी अभ्यासच न शिकवता शाळेत आयोजित होणाऱ्या खेळ तसेच स्पर्धा मध्ये देखील भाग घ्यायला प्रोत्साहित करतात. ते आम्हाला नेहमी हसत खेळत शिक्षण देतात. ...... सर/मॅडम यांनी शिकवलेले धडे लवकर लक्षात रहातात. त्यामुळे माझ्यात मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण होऊन मला लेखनाची आवड लागली आहे. ...... सर/मॅडम माझ्यासाठी तसेच माझ्यासारखी इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहेत. माझ्या जडणघडणीत त्यांचे योगदान नेहमीच महत्वाचे राहील.संकलित पोस्ट (वेबस्त्रोत : विकिपीडिया )
माझा शिक्षक माझा प्रेरक भाषण / निबंध | Maza Shikshak Maza Prerak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
शासन निर्णय काय आहे?
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्डान वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्हान करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविपयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये झालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.