५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियान अंतर्गत उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून शिक्षकदिनादिवशी ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान भाषण / निबंध | Mazya Jivnatil Shikshakanche Sthan | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान भाषण / निबंध | Mazya Jivnatil Shikshakanche Sthan
माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान भाषण / निबंध | Mazya Jivnatil Shikshakanche Sthan | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
निबंध/भाषण- 'माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान'
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
संस्कृत भाषेतील हा श्लोक सर्वांचाच तोंडपाठ आहे. या श्लोकात गुरूंचा महिमा व गुरूंची महती गायली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गुरूचे महत्व अनन्यसाधारण असते. गुरुचे जीवनातील स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गुरु शिष्याच्या दुर्गुणांना दूर करून त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात. ज्या व्यक्तीला एका चांगल्या गुरूचा सहवास लाभला नाही त्याचे जीवन अंधकारमय असते. गुरु आपणास जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. आजच्या युगात गुरूला शिक्षक म्हणूनही संबोधले जाते. शिक्षक आपल्या शिक्षणाच्या मदतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्या शिक्षणामुळेच विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आणि आयुष्यात काहीतरी मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षक एका सुंदर आरशाप्रमाणे असतात. ज्यामध्ये व्यक्ती आपल्या व्यक्तित्वाची ओळख करून घेतो. शिक्षण ही अशी मजबूत शक्ती आहे जिच्या मदतीने आपण समाजाला सकारात्मकतेकडे वळवू शकतो. आणि हे शिक्षण प्रदान करण्यामागे शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बालकाला सर्वात आधी शिक्षण आई-वडिलांकडून दिले जाते. आई हीच त्याला चालणे बोलणे शिकवते. म्हणून आईला बालकाचा पहिला गुरु म्हटले जाते. जेव्हा बालक 5-6 वर्षाचा होतो तेव्हा पहिल्यांदा त्याची शिक्षकांशी भेट होते. शिक्षक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतात. जीवनातील कठीण मार्गावर विद्यार्थी भटकू नये म्हणून शिक्षक नेहमी प्रयत्न करीत असतात. कमी वयातील विद्यार्थ्याचे जीवन ओल्या माती प्रमाणे असते. त्या वयात शिक्षक एका कुंभार प्रमाणे आपल्या हातांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला मजबुती प्रदान करतात. येणाऱ्या भविष्यासाठी ते विद्यार्थ्याला तयार करतात. शिक्षकांच्या मेहनतीमुळेच कोणी डॉक्टर, इंजिनियर, पायलट, वकील, सैनिक इत्यादी बनतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला योग्य व वाईट गोष्टींमधील फरक सांगतात. शिक्षक शिष्टाचार, धैर्य, सहनशीलता इत्यादी गुणांनी जीवन जगायला शिकवतात. शिक्षक आपल्याला शिस्तीचा धडा देतात. याशिवाय वेळेचे योग्य नियोजन कसे करावे याबद्दल देखील ते आपल्याला मार्गदर्शन देतात. विद्यार्थी जीवनात वेळेचे महत्व फार आहे. चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वेळेचा सदुपयोग करता येतो. शिक्षक विद्यार्थ्यांत नेतृत्वाचे गुण विकसित करतात. शिक्षक कधीही साधारण नसतो, एका शिक्षकांच्या हातात प्रलय आणि निर्माण दोन्ही असतात. विद्यार्थ्याचे संपूर्ण भविष्य शिक्षकाच्या हाती असते. म्हणून शिक्षकाचे स्थान लक्षात ठेवण्यासोबतच आई वडील तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की त्याने आपल्यासाठी योग्य आणि शिक्षणासाठी समर्पित असलेल्या शिक्षकांची निवड करायला हवी. आज समाजात अनेक शिक्षक प्रामाणिकपणे आपले कार्य करीत आहेत परंतु त्यांना योग्य पगार दिला जात नाही आहे. ज्यामुळे पैशांच्या समस्येने ते निराश झाले आहेत. अशा होतकरू शिक्षकांना शासनाने योग्य आर्थिक मदत पुरवायला हवी. कारण कोणत्याही राष्ट्राच्या निर्माण मध्ये शिक्षक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणून त्यांच्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आपण सर्वांचे कार्य आहे.संकलित पोस्ट (वेबस्त्रोत : विकिपीडिया )
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
संस्कृत भाषेतील हा श्लोक सर्वांचाच तोंडपाठ आहे. या श्लोकात गुरूंचा महिमा व गुरूंची महती गायली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गुरूचे महत्व अनन्यसाधारण असते. गुरुचे जीवनातील स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गुरु शिष्याच्या दुर्गुणांना दूर करून त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात. ज्या व्यक्तीला एका चांगल्या गुरूचा सहवास लाभला नाही त्याचे जीवन अंधकारमय असते. गुरु आपणास जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. आजच्या युगात गुरूला शिक्षक म्हणूनही संबोधले जाते. शिक्षक आपल्या शिक्षणाच्या मदतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्या शिक्षणामुळेच विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आणि आयुष्यात काहीतरी मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते.
माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान भाषण / निबंध | Mazya Jivnatil Shikshakanche Sthan | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
शासन निर्णय काय आहे?
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्डान वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्हान करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविपयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये झालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.
Tags
शिक्षक दिन विशेष
Thank you very much for this wonderful essay
ReplyDelete