५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियान अंतर्गत उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून शिक्षकदिनादिवशी ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
उपक्रमशील शिक्षक भाषण / निबंध | Upkramshil Shikshak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
उपक्रमशील शिक्षक भाषण / निबंध | Upkramshil Shikshak
उपक्रमशील शिक्षक भाषण / निबंध | Upkramshil Shikshak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
निबंध/भाषण- 'उपक्रमशील शिक्षक'
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
शिक्षकांचे स्थान हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात खूप मोलाचे आहे. शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, संस्कार देतात, पुस्तक रूपी ज्ञान भंडाराकडून जीवनरूपी अनुभवाकडे नेणारे ते शिक्षकच असतात. आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्व आणि सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावतात ते उपक्रमशील शिक्षकच होय. अनेक उपक्रमशील शिक्षकांमुळे प्रतिभावान व सर्जनशील विद्यार्थी व्यक्तिमत्व आकार घेत असते. उपक्रमशील शिक्षक केवळ विषयाचे ज्ञान देत नाहीत तर विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी लपलेल्या उत्कट गुणांच्या माध्यमातून व्यक्त करायला शिकवतात. काही शिक्षक विद्यार्थ्यांना विविध नवोपक्रम च्या माध्यमातून शिकवत असतात. काही शिक्षक छोटी छोटी भाषणे करायला शिकवतात. वेगवेगळ्या कथा वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण करतात.आपले विचार, भावना निबंधाच्या माध्यमातून, कथाकथनाच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून व्यक्त करायला लावणारे शिक्षक मुलांनाही प्रिय होतात. मुलांना आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनुभव वेचायला शिकवणारे, कला, संस्कृती व प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या अंगभूत कौशल्यांना पारखून त्या अनुषंगाने उपक्रमांची आखणी करणारे शिक्षक खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना आकार देत असतात, असेच म्हणावे लागेल. काही शिक्षक मात्र नेमून दिलेल्या कामापेक्षा ही अधिक काम करत असतात.नेमून दिलेल्या कामापुरते मर्यादित न राहता मुलांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये रमवतात. असे सहशालेय उपक्रम मुलांना आनंद देतात. उपक्रमशील शिक्षक मुलांचे आवडते शिक्षक बनतात. कारण उपक्रमांमध्ये मुलांना स्वतः आंतरक्रिया करायला, व्यक्त व्हायला, सहभाग घ्यायला संधी मिळते. आज महाराष्ट्रामध्ये अनेक उपक्रमशील शिक्षक व उपक्रमशील शाळा स्वतःच्या गुणवैशिष्ट्यांमुळे सगळ्यांनाच परिचित आहेत. त्यांचा समाजात एक वेगळा ठसा दिसून येतो. शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमधून मुलांना जीवनमूल्यांचे दर्शन घडते. या शिक्षणातून संस्कार होतात.मुले आणि जीवन शिक्षण यांचा खरा विकास शाळेत वेळोवेळी होणाऱ्या उपक्रमांमधून होत असतो हे खरे आहे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की, 'मुले पुस्तकी ज्ञान स्वतः शिकून घेतील, पण संस्कार, संस्कृती व सामाजिक समन्वयासाठी उपक्रमांची आखणी करून मुलांना विकसित करायला हवे.' मुलांच्या विकासासाठी नवीन नवीन उपक्रम राबवणे हे खूप महत्त्वाचे असून या नवनवीन उपक्रमांमधून विद्यार्थी घडत असतो व त्याचे व्यक्तिमत्व फुलत असते. अशा नवनवीन उपक्रम राबवणारे शिक्षकांना एक वेगळे स्थान प्राप्त होत असते आणि विद्यार्थी मनामध्ये हे शिक्षक एक वेगळे स्थान निर्माण करत असतात.संकलित व इडीट पोस्ट (वेबस्त्रोत : विकिपीडिया )
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
शिक्षकांचे स्थान हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात खूप मोलाचे आहे. शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, संस्कार देतात, पुस्तक रूपी ज्ञान भंडाराकडून जीवनरूपी अनुभवाकडे नेणारे ते शिक्षकच असतात. आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्व आणि सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावतात ते उपक्रमशील शिक्षकच होय. अनेक उपक्रमशील शिक्षकांमुळे प्रतिभावान व सर्जनशील विद्यार्थी व्यक्तिमत्व आकार घेत असते. उपक्रमशील शिक्षक केवळ विषयाचे ज्ञान देत नाहीत तर विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी लपलेल्या उत्कट गुणांच्या माध्यमातून व्यक्त करायला शिकवतात.
काही शिक्षक विद्यार्थ्यांना विविध नवोपक्रम च्या माध्यमातून शिकवत असतात. काही शिक्षक छोटी छोटी भाषणे करायला शिकवतात. वेगवेगळ्या कथा वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण करतात.आपले विचार, भावना निबंधाच्या माध्यमातून, कथाकथनाच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून व्यक्त करायला लावणारे शिक्षक मुलांनाही प्रिय होतात. मुलांना आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनुभव वेचायला शिकवणारे, कला, संस्कृती व प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या अंगभूत कौशल्यांना पारखून त्या अनुषंगाने उपक्रमांची आखणी करणारे शिक्षक खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना आकार देत असतात, असेच म्हणावे लागेल.
काही शिक्षक मात्र नेमून दिलेल्या कामापेक्षा ही अधिक काम करत असतात.नेमून दिलेल्या कामापुरते मर्यादित न राहता मुलांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये रमवतात. असे सहशालेय उपक्रम मुलांना आनंद देतात. उपक्रमशील शिक्षक मुलांचे आवडते शिक्षक बनतात. कारण उपक्रमांमध्ये मुलांना स्वतः आंतरक्रिया करायला, व्यक्त व्हायला, सहभाग घ्यायला संधी मिळते. आज महाराष्ट्रामध्ये अनेक उपक्रमशील शिक्षक व उपक्रमशील शाळा स्वतःच्या गुणवैशिष्ट्यांमुळे सगळ्यांनाच परिचित आहेत. त्यांचा समाजात एक वेगळा ठसा दिसून येतो.
शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमधून मुलांना जीवनमूल्यांचे दर्शन घडते. या शिक्षणातून संस्कार होतात.मुले आणि जीवन शिक्षण यांचा खरा विकास शाळेत वेळोवेळी होणाऱ्या उपक्रमांमधून होत असतो हे खरे आहे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की, 'मुले पुस्तकी ज्ञान स्वतः शिकून घेतील, पण संस्कार, संस्कृती व सामाजिक समन्वयासाठी उपक्रमांची आखणी करून मुलांना विकसित करायला हवे.' मुलांच्या विकासासाठी नवीन नवीन उपक्रम राबवणे हे खूप महत्त्वाचे असून या नवनवीन उपक्रमांमधून विद्यार्थी घडत असतो व त्याचे व्यक्तिमत्व फुलत असते. अशा नवनवीन उपक्रम राबवणारे शिक्षकांना एक वेगळे स्थान प्राप्त होत असते आणि विद्यार्थी मनामध्ये हे शिक्षक एक वेगळे स्थान निर्माण करत असतात.
उपक्रमशील शिक्षक भाषण / निबंध | Upkramshil Shikshak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
शासन निर्णय काय आहे?
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्डान वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्हान करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविपयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये झालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.