प्रस्तुत पोस्टमध्ये गणेश चतुर्थी निमित्त विविध आरती संग्रह संकलित केलेला आहे.
विठोबाची आरती | युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | आरती संग्रह
विठोबाची आरती | युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | आरती संग्रह
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ॥
तुळसीमाळा गळा कर ठेवूनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओवाळू आरत्या कुर्वण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥
विठोबाची आरती | युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | आरती संग्रह | Yuge Atthavis Vitevari Ubha
दररोजच्या महत्वाच्या आरत्या संग्रह
- गणपतीची आरती | सुखकर्ता दु:खहर्ता | आरती संग्रह | Sukhakarta Dukhaharta
- विठोबाची आरती | युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | आरती संग्रह | Yuge Atthavis Vitevari Ubha
- शंकराची आरती | लवथवती विक्राळा | आरती संग्रह | Lavthavti Vikrala
- देवीची आरती | दुर्गे दुर्घट भारी | आरती संग्रह | Durghe Durghat Bhari
- दत्ताची आरती | त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा | आरती संग्रह | Trigunatmak Traimurti Datt Ha Jana
- विठोबाची आरती | येई हो विठ्ठले माझे माऊली ये | आरती संग्रह | Yei Ho Vitthale Maze Mauli Ye
- ज्ञानदेवाची आरती | आरती ज्ञानराजा | आरती संग्रह | Aarti Dnyanraja
- तुकारामांची आरती | आरती तुकारामा | आरती संग्रह | Aarti Tukarama
- घालिन लोटांगण | आरती संग्रह | Ghalin Lotangan
Tags
Aarti Sangrah