A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : ०१ / १२ / २०२४
आजचा सुविचार : गरज ही शोधाची जननी आहे.
दिनविशेष
२००१
ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे शेवटचे उड्डाण. यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्समधे विलीन झाली.
१९९९
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ‘वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.
१९९३
प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय ‘डी. लिट.’ पदवी जाहीर
१९९२
कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर
१९९२
ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.
१९८८
बेनझीर भूट्टो यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नेमणूक झाली.
१९८१
AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
१९७६
अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९७३
पापुआ न्यू गिनीला (ऑस्ट्रेलियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९६५
भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना
१९६४
मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९६३
नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.
१९४८
एस. एस. आपटे यांनी ‘हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
१९१७
कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली.
१९८०
मोहम्मद कैफ – भारतीय क्रिकेटपटू
१९६३
अर्जुना रणतुंगा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व व्यवस्थापक
१९५५
उदित नारायण – पार्श्वगायक
१९११
अनंत अंतरकर – ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांचे संपादक
(मृत्यू: ४ आक्टोबर १९६६)
१९०९
बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते
(मृत्यू: २० मार्च १९५६)
१८८५
आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ‘काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य (१९५२ - १९५८), अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), गुजराथी साहित्यपरिषदेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष (१९५९), हिन्दी विश्वकोश निर्मिती समितीचे सदस्य, साहित्य अकादमी पारितोषिक (१९६६) व फेलोशिप (१९७१) विजेते, पत्रकार व गुजराथी साहित्यिक
(मृत्यू: २१ ऑगस्ट १९८१ - संनिधि आश्रम, नवी दिल्ली)
१७६१
मेरी तूसाँ – ‘मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका
(मृत्यू: १६ एप्रिल १८५०)
१०८१
लुई (सहावा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: १ ऑगस्ट ११३७)
१९९०
विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी
(जन्म: १८ ऑगस्ट १९००)
१९८८
गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.’ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०)
(जन्म: २ आक्टोबर १९०८)
१९८५
शंकर त्रिंबक तथा ‘दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक
(जन्म: १८ जून १८९९)
१८६६
भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट
(जन्म: ४ जुलै १७९०)
११३५
हेन्री (पहिला) – इंग्लंडचा राजा
(जन्म: ? ? १०६८)
पंचांग
बोधकथा
मित्र
विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून. पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,"हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस." आता अजय घाबरला.
कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला
सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. अजयला घाबरलेल्या
अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व
शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर अजयसोबत
बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या
दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम
करू लागला.
तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.