भारताची राज्य घटना ही संघराज्य पद्धतीने लोकशाही जोपासणारी आहे. संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची ही घटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लिहून पूर्ण केली आणि २६ जानेवारी १९५० ला संविधान भारतात लागू करण्यात आले. भारतीय राज्यघटना लिहिण्यास २ वष्रे ११ महिने आणि १७ दिवस लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमाने ही राज्यघटना लिहिली. त्यात त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या बुद्ध तत्त्वांचा समावेश केला. मसुदा समितीत एकूण सात सदस्य होते. एका सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एका सदस्याचे निधन झाले होते आणि एक सदस्य समितीत आलेच नाहीत. एक सदस्य अमेरिकेत राहत होते. एक सदस्य राज्याच्या कारभारात होते आणि दोन सदस्य दिल्लीच्या बाहेर राहत होते. तसेच ते तब्येतीमुळे मसुदा समितीत हजर राहात नव्हते. त्यामुळे एकटेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे काम करीत होते. राज्य घटना लिहिण्याचे कार्य हे दिनांक ९ डिसेंबर १९४६ रोजी सुरू झाले होते.
$ads={1}
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या आधुनिक बुद्धाने मानवतेच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजविले आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून त्यांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. भारतीय राज्य घटना कशी चालवावी, पक्ष आणि प्रशासन व्यवस्था, कायदे यंत्रणा, निरनिराळय़ा योजना व राज्य, केंद्र शासनाची कर्तव्ये, न्यायालयाची कर्तव्ये व वेगवेगळय़ा आयोगाची कर्तव्ये, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, सांसद लोकसभा, राज्यसभा यात निवडून येणा-या लोकांच्या भूमिका आणि कार्य-कर्तव्ये काय आहेत, यांचे संपूर्ण नियोजन भारतीय संविधानात नमूद केलेले आहे. ती योग्य प्रकारे देशातील जनतेच्या हितासाठी, समृद्धीसाठी व विकासासाठी राबवावी हे भारतीय संविधानाचे उद्दिष्ट आहे. नवसमाज व नव भारताची निर्मिती करण्याकरिता मी प्रथमत: भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहे असा महान संदेश या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेला आहे.
प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगण्याची मुभा घटनेने दिली. तसेच कोणत्याही धर्मावर जबरदस्तीने धर्मातर न करण्याची अटही घातली आहे. भारतीय संविधानात प्रत्येक माणसाला त्याच्या इच्छेप्रमाणे धर्म स्वीकारण्याची व बदलण्याची मुभा दिलेली आहे. भारतीय संविधानात वेळप्रसंगी कायद्याच्या कलमांमध्ये बदल करण्याचा अधिकारही दिलेला आहे. संविधानाची अंमलबजावणी जर यथायोग्य झाली तर या देशाचे कल्याणच होईल. पण भारतात हजारो वर्षापासून ब्राह्मणी वर्णव्यवस्थेचा पगडा असल्यामुळे जैन, ख्रिश्चन, मुसलमान, इसाई, शिख व अन्य धर्म, पंथ यांचीही मानसिकता हिंदुधर्माला पोषक आहे. या देशात बौद्ध धम्म आणि हिंदू धर्म यांचा संघर्ष हजारो वर्षापासून चालतच आहे आणि पुढेही असाच चालू राहणार आहे.
भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. जगातील सर्वात मोठी राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली आहे. भारतात अनेक जाती, धर्म, पंथ, वंश, समुदाय, गोत्र, भाषा राहणीमान, प्रांत असतांनासुद्धा सर्वाना भारतीय राज्य घटनेने एका सूत्रात बांधून सर्वाना भारतीय लोकशाही प्रणाली बहाल केली आहे.
लोकशाही व गणराज्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही देशांमध्ये लोकशाही आहे पण गणराज्य नाही. गणराज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला त्या देशातील खालच्या पदापासून ते उच्च पदापर्यंत त्याच्या क्षमतेनुसार ते ते पद हासिल करण्याची समान संधी असते. म्हणूनच आज भारत देशामध्ये वंचित घटक सुध्दा राष्ट्र निर्मिती मध्ये सामील होत आहे. झोपडपट्टी मधुन सूद्धा IAS IPS अधिकारी, पंतप्रधान व राष्ट्रपति निर्माण करण्याची ताकद भारतीय संविधानामध्ये आहे. या क्रांतीची साऱ्या जगाने दाखल घेतली. क्रांती म्हणजे एखादी समाज व्यवस्था उपटून त्या जागी नवीन समाजव्यवस्था निर्माण करणे. १९५० पूर्वी या देशात सामाजिक विषमता, जातीयवाद या सारखी विषमतावादी समाजव्यवस्था होती. बहुसंख्यांक लोकांना, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. १९५० ला संविधानाच्या माध्यमातून समता, स्वतंत्र, बंधुता आणि न्याय या चतुसूत्रीवर समाजव्यवस्था निर्माण झाली. त्यामुळे आपण याला क्रांतिकारी घटना मानले पाहिजे. घटनाकार बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांनी या क्रांती च्या माध्यमातून चार प्रमुख उद्देश यशस्वी केले-
शासन परिपत्रक काय आहे?भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन,काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये,पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा , संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश,संविधान आणि शिक्षण इ. विषयावर परिसंवाद,तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने यांचे आयोजन करण्यात यावे.