माझे संविधान माझा अभिमान उपक्रम अंतर्गत नमुना भारतीय संविधान घोषवाक्ये दिलेली आहेत. प्रस्तुत घोषवाक्ये ही संकलित असून आपण याप्रमाणे तयार करू शकता.
भारतीय संविधान घोषवाक्ये | संकलित घोषवाक्ये | Bhartiy Sanvidhan Ghoshavakye | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
संविधानाची महानता
विविधतेत एकता
भारत माझी माऊली
संविधान त्याची सावली
भारताचे संविधान,
भारतीयांचा सन्मान
स्वातंत्र्य, समता, बंधुता,
संविधान सांगते एकात्मता
$ads={1}
वंचिताना देई उभारी,
भारतीय संविधान लय भारी
बाबासाहेबांचे योगदान,
भारताचे संविधान
लोकशाहीचे देते भान,
भारतीय संविधान
श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य
हाच संविधानाचा मूलमंत्र
नको ताई घाबरू
चल संविधान राबवू
जर हवी असेल समता
तर मनात जागवू बंधुता
सबसे प्यारा
संविधान हमारा
कर्तव्य, हक्कांचे भान
मिळवून देते संविधान
संविधान एक परिभाषा है
मानवता की आशा है
संविधानावर निष्ठा
हीच व्यक्तीची प्रतिष्ठा
संविधानाची मोठी शक्ती
देई आम्हा अभिव्यक्ती
मिळून सारे देऊ ग्वाही
सक्षम बनवू लोकशाही
संविधानाची कास धरू
विषमता नष्ट करू
सर्वांचा निर्धार
संविधानाचा स्वीकार
संधीची समानता
संविधानाची महानता
संविधानाने दिले काय?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
संविधान आहे महान
सर्वांना हक्क समान
लोकशाही गणराज्य घडवू
संविधानाचे भान जागवू
संविधानाचा सन्मान
हाच आमचा अभिमान
भारत माझी माऊली
संविधान त्याची सावली
$ads={2}
अरे, डरने की क्या बात है?
संविधान हमारे साथ है
विवेक पसरवू जनाजनात
संविधान जागवू मनामनात
समता, बंधुता, लोकशाही
संविधानाशिवाय पर्याय नाही
श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य
हाच संविधानाचा मूलमंत्र
नको ताई घाबरू
चल संविधान राबवू
जब तक सूरज चाँद,
तब तक संविधान
जर हवी असेल समता
तर मनात जागवू बंधुता
सबसे प्यारा
संविधान हमारा
अरे, डरने की क्या बात है?
संविधान हमारे साथ है
संविधानाची महानता
विविधतेत एकता
देशभरमे एकही नाम
संविधान! संविधान!
समानता कशाची?
दर्जाची, संधीची
सर्वांना देई दर्जा समान,
संविधानाचे काम महान
संविधानाचे आश्वासन,
सर्वांना कायद्याचे संरक्षण
आपला देश, आपले सरकार,
संविधानाने दिला अधिकार
संविधान भारताचा आधार,
कुणी नसेल निराधार
हक्क बजावू, कर्तव्य पाळू
प्राणपणाने संविधान सांभाळू
संविधानाची हीच ग्वाही,
उच्च-नीच कोणी नाही
नको राजेशाही, नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही
भारताचे एकच विधान,
संविधान ! संविधान !
अरे, सबके मुँह में एकही नारा
संविधान हमारा सबसे प्यारा
लोकशाहीचा जागर
संविधानाचा आदर
तुमचा आमचा एकच विचार
संविधानाचा करू प्रचार
ना एक धर्म से, ना एक सोच से
ये देश चलता है संविधान से!
दर्जाची, संधीची, समानता,
हीच संविधानाची महानता
समानता संधींची,
संविधानाच्या गाभ्याची
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,
हाच संविधानाचा हेतू हाय
संविधानाची अफाट शक्ती,
मुक्तविचार अन् अभिव्यक्ती
संविधान सर्वांसाठी,
हक्कासाठी, न्यायासाठी
ऊठ, नागरिका, जागा हो,
संविधानाचा धागा हो
जातीयतेच्या बेड्या तोडू,
संविधानाने भारत जोडू
संविधान आपले आहे कसे ?
सर्वांना न्याय देईल असे
संविधानाने दिला मान,
स्त्री-पुरुष एकसमान
संविधानाचा विचार काय ?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
संविधान देते समान पत,
एक व्यक्ती – एक मत
घरात कोणत्याही धर्माचे,
समाजात मात्र संविधानाचे
अत्याचार-जुलूम नष्ट करा,
संविधानाचा ध्यास धरा
भारताचा अभिमान,
संविधान ! संविधान !
समाजाला जागवू या,
संविधान रुजवू या
भारतीय संविधान घोषवाक्ये | संकलित घोषवाक्ये | Bhartiy Sanvidhan Ghoshavakye | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
शासन परिपत्रक काय आहे?भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन,काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये,पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा , संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश,संविधान आणि शिक्षण इ. विषयावर परिसंवाद,तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने यांचे आयोजन करण्यात यावे.
Tags
भारतीय संविधान