२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त माझे संविधान माझा अभिमान उपक्रम अंतर्गत उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
भारतीय संविधानिक मूल्ये | निबंध / भाषण / वक्तृत्व | Bhartiy Sanvidhanik Mulye | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Sanvidhan Din | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
भारतीय संविधानिक मूल्ये | निबंध / भाषण / वक्तृत्व | Bhartiy Sanvidhanik Mulye | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
इयत्ता नववी ते बारावी - निबंध / भाषण / वक्तृत्व
निबंध/भाषण- भारतीय संविधानिक मूल्ये
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची, कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे या मूल्यांचा अर्थ आपण सविस्तर पाहू.
१) न्याय -
अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाय योजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. उद्देशिकेमध्ये न्यायाचे तीन प्रकार सांगितले आहेत ते पुढील प्रमाणे-
सामाजिक न्याय -
व्यक्तिंमध्ये जात, धर्म,वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो.
आर्थिक न्याय -
भूक, उपासमार, कुपोषण याबाबी गरीबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे.
राजकीय न्याय -
राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारले आहे. त्यानुसार वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे.
$ads={1}
२) स्वातंत्र्य -
स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक, अयोग्य निर्बंध नसणे. आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते.
विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तींचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाण-घेवाण ने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याच बरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात.
श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपले सण-उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थाने बाळगण्याचे व उपासना यांचे स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे.
३) समता -
उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतीत समतेची हमी दिली आहे. जात, धर्म , वंश, जात, लिंग ,ज इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल असा याचा अर्थ आहे. उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. उद्देशिकेने 'संधीची समानता' महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील, त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
संविधानाच्या उद्देशिकेचे एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्त्वाचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय.
४) बंधुता -
संविधानकारांना असे वाटत होते की, केवळ न्यायाची स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही, तोपर्यंत या कायद्यांचा उपयोग होणार नाही. म्हणूनच बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्ट उद्देशिकेत समाविष्ट केले आहे. बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात.
बंधुभाव आणि व्यक्ती प्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्ती प्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबींवर ठरत नाही. आपल्याला ज्या प्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवावे असे वाटते, तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींचा केला पाहिजे.
$ads={2}
जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल, तेव्हा आपोआप व्यक्ती प्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभाव ही सहजरित्या वाढीस लागेल. न्याय व समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे कामही अधिक सोपे होईल. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होते.
वरील संविधानिक मूल्ये भारतीय संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणास सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. यातील मूल्ये, विचार आणि हेतू उदात्त आहेत, याचे आचरण व पालन प्रत्येक नागरिकाने केले पाहिजे.
© गुरुमाऊली
भारतीय संविधानिक मूल्ये | निबंध / भाषण / वक्तृत्व | Bhartiy Sanvidhanik Mulye | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
शासन परिपत्रक काय आहे?भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन,काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये,पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा , संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश,संविधान आणि शिक्षण इ. विषयावर परिसंवाद,तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने यांचे आयोजन करण्यात यावे.
Tags
भारतीय संविधान