सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शाळांना दिवाळी सणाच्या सुट्ट्या घोषित करणेबाबत ०३/११/२०२१ आदेश आलेला असून राज्यातील सर्व शाळांसाठी लागू आहे.
शासन परिपत्रक काय आहे?
संदर्भ :
१. शासन परिपत्रक (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१४२/एस.डी.-४,दि. २७/१०/२०२१.
२. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/संकिरण/५१६/२०२१/३५५१, दि. २७/१०/२०२१.
३. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या दिनांक ०२/११/२०२१ रोजीच्या बैठकीमधील निर्देश.
उपरोक्त संदर्भ क्र. १ व २ अन्वये राज्यातील इ. १ ली ते इ. १२ वी च्या शाळांना दिवाळी सणाच्या अनुषंगाने दिनांक २८/१०/२०२१ ते दिनांक १०/११/२०२१ या कालावधीची सुट्टी घोषित करण्यात आली आहे. तसेच, दि. ११/११/२०२१ पासून नियमित शाळा सुरू करण्याचे निर्देश आहेत. दिनांक १२/११/२०२१ रोजी राज्यात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. उपरोक्त संदर्भिय परिपत्रकामुळे दिवाळीच्या सुट्ट्या कमी झाल्या असतील तर दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे अनुज्ञेय असणाऱ्या सुट्ट्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) परीक्षा झाल्यानंतर किंवा नाताळच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेवूनसमायोजित कराव्यात. सदरील पत्र हे सर्व संबंधित शाळांना लागू राहील. असे शिक्षण संचालक (प्राथमिक) मा.श्री. दिनकर टेमकर यांनी आदेशित केलेले आहे.
सदर प्रत माहितीस्तव सविनय सादर केलेली आहे-
१. मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
४. मा. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.