संविधान दिन निबंध/भाषण स्पर्धा २०२१ | २६ नोव्हेंबर भाषण/ निबंध स्पर्धा | Sanvidhan din Nibandh /Bhashane | 26 novhembar marathi bhashane
संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो. असंख्य भाषा, जाती ,पंथ,धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता,न्याय ,समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वांतत्र्य,दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणारे भारतीय संविधान दि.२६ नोव्हेंबर,१९४९ रोजी देशाला अर्पण करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत.संविधानातील मूलतत्त्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरिता संविधानाची माहिती,संविधानातील मूलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलतत्वांविषयी जाणीवजागृती होणे अशा विविध उद्देशांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
$ads={2}
विद्यार्थ्यांना सहभागी होताना अडचणी न येण्यासाठी आम्ही वरील विषयाशी संबंधित भाषणे/निबंध/रांगोळी एक नमुना म्हणून आपल्याला स्वनिर्मित व संकलित करून देत आहोत. त्याचा आधार घेऊन आपण स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
✅ भारतीय संविधान घोषवाक्ये | संकलित घोषवाक्ये | Bhartiy Sanvidhan Ghoshavakye | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम | इथे क्लिक करा
$ads={1}
इयत्ता तिसरी ते पाचवी- भाषण / वक्तृत्व
इयत्ता तिसरी ते पाचवी | भारतीय संविधान | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Bhartiy Sanvidhan | Sanvidhan Bhashane | 26 novhembar marathi bhashane
⓵भाषण : भारतीय संविधान | Bhartiy Sanvidhan | इथे क्लिक करा
इयत्ता तिसरी ते पाचवी | माझ्या शाळेतील संविधान दिवस | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Mazya Shaletil Sanvidhan Divas | Sanvidhan Bhashane | 26 novhembar marathi bhashane
⓶भाषण : माझ्या शाळेतील संविधान दिवस | Mazya Shaletil Sanvidhan Divas | इथे क्लिक करा
इयत्ता सहावी ते आठवी- निबंध/भाषण
इयत्ता सहावी ते आठवी | संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Sanvidhan Yatra / Sanvidhan Nirmiticha Pravas | Sanvidhan Bhashane | 26 novhembar marathi bhashane
इयत्ता सहावी ते आठवी | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Bhartiy rajyaghatneche shilpkar | Sanvidhan Bhashane | 26 novhembar marathi bhashane
इयत्ता सहावी ते आठवी | भारतीय संविधान आणि लोकशाही | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Bhartiy Sanvidhan aani lokshahi | Sanvidhan Bhashane | 26 novhembar marathi bhashane
इयत्ता नववी ते बारावी - निबंध/भाषण
इयत्ता नववी ते बारावी | भारतीय संविधानिक मूल्ये | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Bhartiy Sanvidhanik Mulye | Sanvidhan Bhashane | 26 novhembar marathi bhashane
इयत्ता नववी ते बारावी | भारत देशापुढील सद्यस्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Bharat Deshapudhil Sadyasthititil Aavhane Aani Bhartiy Sanvidhan | 26 novhembar marathi bhashane
इयत्ता नववी ते बारावी | सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Sarvabhaumatv Sanvidhanache, Janhit Sarvanche | 26 novhembar marathi bhashane
इयत्ता नववी ते बारावी | भारत देशाचा सन्मान, माझे भारतीय संविधान | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Bharat Deshacha Sanman,Maze Bhartiy Sanvidhan | 26 novhembar marathi bhashane
शासन परिपत्रक काय आहे?
भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन,काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये,पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा , संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश,संविधान आणि शिक्षण इ. विषयावर परिसंवाद,तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने यांचे आयोजन करण्यात यावे.
“माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम अंतर्गत खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा / कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यमांवर (फेसबुक,ट्वीटर,इंस्टाग्राम)
#Constitutionday2021
#Constitutionweek2021
#MyConstitutionMyPride
या HASHTAG (#) चा वापर करून आपल्या व्हिडीओ,फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्या भागात शाळा बंद आहेत, त्या भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन माध्यमातुन सहभागी व्हावे. सदर कार्यक्रमांतर्गत समाजमाध्यमांवर अपलोड करण्यात आलेल्या पोस्टच्या नोंदी करण्यासाठी ऑनलाईन लिंक आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठीच्या सविस्तर सुचना संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिपद, महाराष्ट्र,पुणे यांचेमार्फत निर्गमित करण्यात येतील.