संविधान दिन प्रश्नमंजुषा | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम | आकर्षक प्रमाणपत्र | Sanvidhan Din Prashnmanjusha
भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
शासनाने प्रश्नमंजुषा उपक्रम घेण्यासाठी सांगितलेला आहे.
विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवल्यावर Submit बटणाला क्लिक केल्यावर View score ला क्लिक करून किती गुण मिळाले ते पाहता येईल. त्यानंतर त्या पेजचा स्क्रीनशॉट काढून आपल्या वर्गशिक्षकांना पाठवा.
प्रस्तुत चाचणी ही १०० गुणांची असून त्यात २५ प्रश्न समाविष्ट आहेत.
संविधान दिन प्रश्नमंजुषा
- सदरील सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा किती गटात होणार आहे?
सदरील सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा ही सर्वांसाठी खुली असेल.
- या प्रश्नमंजुषा मध्ये एकूण किती प्रश्नांचा समावेश आहे?
प्रत्येक गटातील प्रश्नमंजुषा मध्ये एकूण २५ प्रश्न समाविष्ट असून प्रत्येक प्रश्न चार गुणांसाठी आहे. तुम्हाला २५ प्रश्न सोडवून चाचणी submit लागेल. शेवटी View Score ला क्लिक करून तुम्हाला किती गुण मिळाले हे देखील समजेल.
- प्रमाणपत्र कोणाला व केव्हा मिळणार आहे?
प्रश्नमंजुषा ज्यांनी ६ डिसेंबरपर्यंत सकाळी ८ वाजेपर्यंत सोडवलेली आहे, त्यांचे प्रमाणपत्र अपलोड केलेले आहेत. यापुढे तुम्ही सरावासाठी प्रश्नमंजुषा सोडवू शकता. खालील बटनाला क्लिक करा.