२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त माझे संविधान माझा अभिमान उपक्रम अंतर्गत उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
माझ्या शाळेतील संविधान दिवस | भाषण / वक्तृत्व | Mazya Shaletil sanvidhan divas | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
माझ्या शाळेतील संविधान दिवस | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Mazya Shaletil sanvidhan divas | Sanvidhan Bhashane | 26 novhembar marathi bhashane
इयत्ता तिसरी ते पाचवी
निबंध/भाषण - माझ्या शाळेतील संविधान दिवस
भारतीय स्वातंत्र्याची एक महत्त्वाची घटना म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस वर्ष 2015 पासून भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जात आहे. भारताचे संविधान आणि आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून आपण २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करत असतो.
माझ्या शाळेत संविधान दिन मी वेगळ्या कल्पनेने साजरा करेन. भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणार आहेत. हीच तत्त्वे शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना देशाचे जागरूक बनविणे आवश्यक आहे. संविधानातील तत्त्वांचा प्रसार व प्रचार करण्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरूवातीपासून संविधानाची पुरेशी ओळख व त्यातील तत्त्वांविषयी जागृती करून देण्यासाठी हा संविधान दिवस शाळांमध्ये साजरा करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे आम्ही वाचन करू.
$ads={1}
संविधान दिनी संविधानाच्या प्रास्ताविकचे वाचन झाल्यानंतर संविधान यात्रा आम्ही काढू. संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, स्लोगन, पोस्टर्स, समुहगान आदी स्पर्धांचे कार्यक्रमांचे आयोजन आम्ही शाळेत करणार असून विद्यार्थ्यांसोबत पोलिस, सर्वसामान्य नागरिकांनाही संविधानाची आणि त्यातील मौलिक तत्त्वाची माहिती होणे आवश्यक असल्याने आम्ही पालक मिटिंग घेऊन सविस्तर माहिती पालकांना देऊ.
तसेच संविधान वाचन घेऊ. त्यामुळे शालेय जीवनापासून- बालवयापासूनच मुला-मुलींना संविधानाची माहिती होईल. शाळा, महाविद्यालयातून संविधान वाचनामुळे मुला-मुलींची मने सुसंस्कारित होतील. दररोजच्या वाचनामुळे प्रास्ताविकाचे पाठांतर होईल. प्रास्ताविकामधील शब्दांचा अर्थ हळूहळू समजू शकेल. मुला-मुलींच्या माध्यमातून संविधानाबाबत माहिती होईल. देशाचा-राज्याच्या संपूर्ण कारभार संविधानाच्या अंतर्गत चालतो हे समजेल.संविधान सन्मान म्हणजेच देश सन्मान-राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळे संविधानाचे महत्व लक्षात येईल.
१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ऍटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक डिसेंबर ९ १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. ऑगस्ट १५ १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.
$ads={2}
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
ही माहिती प्रत्येक नागरिकांना असणे आवश्यक असून संविधानाची व्याप्ती व महत्व पटवून देणे आपले कर्तव्य आहे.
धन्यवाद...!
माझ्या शाळेतील संविधान दिवस | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Mazya Shaletil sanvidhan divas | Sanvidhan Bhashane | 26 novhembar marathi bhashane
शासन परिपत्रक काय आहे?भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन,काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये,पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा , संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश,संविधान आणि शिक्षण इ. विषयावर परिसंवाद,तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने यांचे आयोजन करण्यात यावे.
Tags
भारतीय संविधान