२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त माझे संविधान माझा अभिमान उपक्रम अंतर्गत उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
भारतीय संविधान | भाषण / वक्तृत्व | Bhartiy Sanvidhan | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
भारतीय संविधान | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Bhartiy Sanvidhan | Sanvidhan Bhashane | 26 novhembar marathi bhashane
इयत्ता तिसरी ते पाचवी
निबंध/भाषण - भारतीय संविधान
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून ओळखले जाते. भारताचे संविधान हे हस्तलिखित स्वरूपामध्ये पाहायला मिळते. भारतीय संविधान पूर्णता लिहिण्यासाठी सुमारे 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले. स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जात होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये म्हणजेच 2015 पासून हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.
2015 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या स्मरणार्थ संविधान दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले आणि त्यानुसार आजपर्यंत 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जात आहे. भारताची राज्यघटना म्हणजेच आपले संविधान हे भारत देशाचा पायाभूत कायदा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, ज्यांनी आपल्या देशाला संघटित आणि एकत्रित करण्यासाठी व प्रजासत्ताक करण्यासाठी हे संविधान लिहिले. तसेच आपल्या देशाचा कायदा आणि संघटन ही एक सूत्राने चालावे यासाठी आपल्या देशाचे संविधान खूप महत्त्वाचे ठरते.
$ads={1}
1950 साली अंमलात आणलेले हे संविधान 1935 च्या भारतीय कायद्यावर आधारित आहेत. नागरिकत्व, निवडणूका आणि अंतरिम संसदे विषयी आणि इतर काही तात्पुरत्या बाबी या संविधानानुसार लागू झाल्या. आणि या बाबी 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधान रूपाने संपूर्ण देशभरात लागू झाल्या व आपल्या देशाला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक प्राप्त झाले. भारताचे संविधान उद्देशिका मुख्य भाग व 12 पुरवण्या अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांचे अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या काळातील 395 कलम पैकी काही कलमे आता कालबाह्य केलेली आहेत. सध्या भारतीय संविधानामध्ये 448 कलमे असून भारतीय संविधान जगभरातील सर्वात मोठे संविधान म्हणून ओळखले जाते.
भारतीय संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, समतेचा हक्क, सांस्कृतिक हक्क, धार्मिक हक्क, शोषणविरोधी चा हक्क हे मूलभूत हक्क संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला बहाल केलेले आहे. त्याच बरोबर संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीय प्रतिकांचा मान राखणे, त्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, देशाचे अखंडत्व कायम राखणे, देशाचेज सार्वभौमत्व कायम राखणे, मग त्याची काळजी घेणे हे देखील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. आपल्या हक्कांची सोबत आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा भारताचे संविधान आहे सर्वोत्कृष्ट मानले जाते. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो. तसेच भारताच्या संविधान दिनानिमित्त भारतात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
$ads={2}
मुख्यता हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आणि इतर शासकीय प्रशासनाने व ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते की वकृत्व स्पर्धा, भाषण, चित्रकला, डान्स अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. संविधानानुसार प्राप्त झालेले हक्क आणि जबाबदार्या जाणून घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि संविधानानुसार दिलेल्या सर्व कायद्यानुसार वागणे हे आपले प्राथमिक कर्तव्य मानले पाहिजे. व सदैव आपल्या संविधानाचा सन्मान आणि अभिमान केला पाहिजे.
धन्यवाद...!
भारतीय संविधान | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम | २६ नोव्हेंबर मराठी भाषण २०२१ | संविधान दिन भाषण | Bhartiy Sanvidhan | Sanvidhan Bhashane | 26 novhembar marathi bhashane
शासन परिपत्रक काय आहे?भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन,काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये,पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा , संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश,संविधान आणि शिक्षण इ. विषयावर परिसंवाद,तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने यांचे आयोजन करण्यात यावे.
Tags
भारतीय संविधान