राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका | NAS SAMPLE EXAM PAPER | NAS 2021
राष्ट्रीय संपादणूक चाचणी (NAS Exam) आयोजनाबाबत महत्वपूर्ण माहिती :
⏰ राष्ट्रीय संपादणूक चाचणी (NAS Exam) चे स्वरूप :
⏰ राष्ट्रीय संपादणूक चाचणी (NAS Exam) साठी सुचना :
⏰ राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचे नियोजन व कार्यवाही कशी असेल?
⏰ राष्ट्रीय संपादणूक चाचणी NAS Exam Result केव्हा असणार आहे?
राष्ट्रीय संपादणूक चाचणी (NAS Exam) आयोजनाबाबत महत्वपूर्ण माहिती :
भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राज्यभरात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी National Achievement Survey (NAS) 12 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. यासंबंधित मार्गदर्शनपर सुचना व प्रश्नपत्रिका खाली दिलेल्या आहेत.
- संपूर्ण देशभरात प्रत्येक जिल्ह्यातील निवडक इ. 3 री आणि 5 वी च्या प्रत्येकी 61 वर्गांवर व 8 वी च्या 51 वर्गावर हे सर्वेक्षण होणार आहे.
- प्रत्येक जिल्ह्यातील एकूण 173 वर्गावर राष्ट्रीय संपादणूक चाचणी (National Achievement Survey) सर्वेक्षण होणार आहे.
- राष्ट्रीय संपादणूक चाचणी (NAS) सर्वेक्षणासाठी शाळा आणि त्यातील वर्ग NCERT यानी स्वतः Random पद्धतीने निवडलेले आहेत.
- शाळा निवडतांना NCERT कडून S, R1 आणि R2 या प्रकारात शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
- S (selected), R1 (reserve ) आणि R2 (reserve 2) या प्राधान्यक्रमानुसार व अपेक्षित निकषानुसार शाळा फायनल केल्या जातील.
- या सर्वेक्षणाअंतर्गत निवडलेल्या शाळेतील निवडलेल्या वर्गामध्ये दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी चाचणी होणार आहे.
⏰ राष्ट्रीय संपादणूक चाचणी (NAS Exam) साठी सुचना :
- Objective / MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न या चाचणी मध्ये असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल (●) करणे अपेक्षित आहे.
- इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरण शास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 60 मिनीट)
- इयत्ता 8 वी व 10 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र (Environment Science) व सामाजिक शास्त्र (Social Science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)
- NAS चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न इयत्तानिहाय क्षमतावर आधारित असणार आहेत.
⏰ राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचे नियोजन व कार्यवाही कशी असेल?
- या सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर DMU (District Monitoring Unit) स्थापन केले आहे. यामध्ये DIECPD प्राचार्य / शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.
- चाचणीच्या दिवशी हे DMU भरारी पथक म्हणून जिल्हास्तरावर काम करेल, जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देण्याचे त्यांचे नियोजन असणार आहे.
- चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक शाळेमध्ये शासकीय स्तरावरून किमान एक पर्यवेक्षक (Field Investigator) उपलब्ध करून दिला जाणार आहे. याच्या मार्फत संबंधित वर्गाची चाचणी शाळांनी घ्यावयाची आहे.
- आपल्या शाळेसाठी उपलब्ध करून दिलेले पर्यवेक्षक (F1) चाचणीच्या एक-दोन दिवस अगोदर आपल्या शाळेला भेट देतील व शालेय स्तरावर चाचणी संबंधीच्या झालेल्या नियोजनाची पाहणी करतील.
- प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी चाचणीच्या एक दिवस अगोदर जिल्हा / तालुका स्तरावरून सीलबंद स्थितीमध्येच ताब्यात घ्यायच्या आहेत.
- आपल्याला मिळालेल्या सीलबंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका या पर्यवेक्षका समोरच बाहेर काढायच्या आहेत व त्यावर पर्यवेक्षकाची व दोन साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यायची आहे.
- निवडलेल्या वर्गातील जास्तीत जास्त 30 विद्यार्थ्यासाठी चाचणी होणार आहे. मात्र वर्गाची पटसंख्या 30 पेक्षा जास्त असतील तरीही चाचणीच्या दिवशी 100% (सर्व) विद्यार्थ्यांना हजर ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी शाळेची आहे.
- चाचणी सोडवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे चाचणीच्या दिवशी निळा / काळा बॉलपेन असावा असे नियोजन शाळेने करावयाचे आहे.
- निवडलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शाळेने आपल्या दप्तरी ठेवून चाचणी दिवशी आलेल्या पर्यवेक्षकाकडे द्यायचे आहे.
- चाचणी पूर्ण झाल्यावर पर्यवेक्षकाच्या मदतीने प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व इतर साहित्याचे used व unused प्रकारात वर्गीकरण करून ते दोन वेगवेगळ्या लिफाफ्यामध्ये सीलबंद करायचे आहेत.
- उत्तरपत्रिकांचे सीलबंद लिफाफे राज्यस्तरावर पाठविले जाणार आहेत.
⏰ राष्ट्रीय संपादणूक चाचणी NAS Exam Result केव्हा असणार आहे?
- परीक्षेच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी राज्यस्तरावर OMR पद्धतीने होईल.
- प्रत्येक तालुकानिहाय निकाल NAS च्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
- यातून प्रत्येक तालुक्याची तुलना करता येईल, राज्यातील / जिल्ह्यातील कुठला तालुका कुठल्या क्षमतेमध्ये मागे पुढे आहे हे समजेल.
- आलेल्या निकालावरून NCERT, SCERT आणि DIECPD यांचेकडून मिळणार्या सुचनांची अंमलबजावणी संबंधित तालुक्यांना करावयाची आहे.
Tags
Breaking News