२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त माझे संविधान माझा अभिमान उपक्रम अंतर्गत उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे | निबंध / भाषण / वक्तृत्व | Sarvabhaumatv Sanvidhanache, Janhit Sarvanche | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Sanvidhan Din | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे | निबंध / भाषण / वक्तृत्व | Sarvabhaumatv Sanvidhanache, Janhit Sarvanche | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
इयत्ता नववी ते बारावी - निबंध / भाषण / वक्तृत्व
सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे
सार्वभौमत्व याचा शब्दशः अर्थ सर्वश्रेष्ठ किंवा सर्वोच्च स्थान, अंतिम सत्ता होय.
भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी हे राजवट संपली. आपला देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे.
आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो.
$ads={1}
या सार्वभौम लोकशाही राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते. म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. संविधानाने नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात.
आपल्या देशात लोकशाही बरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिले जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेने येत नाही.
संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची, कायदे करून ती मुल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे.
राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे.
लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तींचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाण-घेवाण ने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजू ही आपल्याला समजतात.
भारतीय नागरिकांना संविधानाने दर्जा आणि संधी या बाबतीत देखील समतेची हमी दिली आहे. जात, धर्म, वंश , लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल असा याचा अर्थ आहे. यामध्ये आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील . त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
$ads={2}
संविधानाच्या उद्देशिकेत एक अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्त्वांचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा ते तत्त्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. बंधुभाव आणि व्यक्ती प्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्ती प्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश , लिंग,भाषा इत्यादी बाबींवर ठरत नाही. आपल्याला ज्या प्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवावे असे वाटते , तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींच्या केला पाहिजे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल, तेव्हा आपोआप व्यक्ती प्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभावही सहजरित्या वाढीस लागेल. न्याय व समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे काम अधिक सोपे होईल.
एकंदरीत संविधानाच्या सार्वभौमत्वामुळे सर्व लोकांचे हित होत असून यामध्ये हुकूमशाही ला स्थान नसते. म्हणून भारतीय संविधान हे जगातील सर्वोच्च संविधान आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे | निबंध / भाषण / वक्तृत्व | Sarvabhaumatv Sanvidhanache, Janhit Sarvanche | माझे संविधान माझा अभिमान उपक्रम
शासन परिपत्रक काय आहे?भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत “माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन,काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्ये,पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. तसेच या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संविधान दिनादिवशी सकाळी १० वाजता एकाच वेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा , संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश,संविधान आणि शिक्षण इ. विषयावर परिसंवाद,तज्ज्ञांची प्रबोधनपर व्याख्याने यांचे आयोजन करण्यात यावे.
Tags
भारतीय संविधान