राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
प्रतिज्ञा
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : १० / १२ / २०२३
आजचा सुविचार : डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
दिनविशेष
२०१४
भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००८
प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
१९७८
ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९१६
‘संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९०६
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
१९०१
नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
१८६८
पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.
१८९२
व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक
(मृत्यू: १५ मार्च १९३७)
१८८०
डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.
(मृत्यू: ८ जानेवारी १९६७ - पुणे)
१८७८
चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक
(मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)
१८७०
सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार
(मृत्यू: १९ मे १९५८)
२०१४
चंद्रकांत खोत – लेखक, कवी आणि संपादक. अतिशय मनस्वी आणि तरीही अलिप्त असे साहित्यिक म्हणून खोत यांची ओळख होती. विवेकानंद यांच्या आयुष्यावरची ‘बिंब-प्रतिबिंब’ ही त्यांची गाजलेली कादंबरी होती. तसंच रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या नात्यावरची ‘दोन डोळे शेजारी’ ही त्यांची कादंबरीही खूप गाजली.
‘अबकडई’ या दिवाळी अंकाचं संपादनही त्यांनी केलं होतं. खोत यांनी धाडसी लिखाणही केलं होतं. मुंबईतल्या पुरूष वेश्यांच्या जीवनावरची ‘उभयान्वयी अव्यय’ ही त्यांची कादंबरी बरीच गाजली.
(जन्म: १७ सप्टेंबर १९४० - भीमाशंकर)
(Image Credit: News-18 लोकमत)
२००९
दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार
(जन्म: १७ सप्टेंबर १९३८)
(Image Credit: Alchetron)
२००३
श्रीकांत ठाकरे – संगीतकार
२००१
अशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी’ – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या
(जन्म: १३ ऑक्टोबर १९११)
(Image Credit: IMDb)
१९६४
शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार
(जन्म: १७ ऑगस्ट १९०५)
१९६३
सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित
(जन्म: ३ जून १८९५)
१९५५
आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक
(जन्म: २६ सप्टेंबर १८९४)
१९२०
होरॅस डॉज – ‘डॉज मोटर कंपनी‘चे एक संस्थापक
(जन्म: १७ मे १८६८)
१८९६
अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
(जन्म: २१ आक्टॊबर १८३३)
पंचांग
बोधकथा
शौर्याचा पुरावा
बादशहा अकबराचा दरबार भरला होता. तेवढयात द्वारपालाने येऊन सांगितले की, बाहेर दोन राजपूत युवक आले आहेत. ते राजाला काही सांगू इच्छितात. अकबराने त्यांना दरबारात हजर करण्याची आज्ञा केली. ते दोन्ही युवक अगदी सुदृढ, पिळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या हातात ढाल व तलवार होती. अकबराने त्यांना बोलण्याची परवानगी दिली. ते म्हणाले, “आम्ही राजपूत आहोत, आमची तुम्हाला विनंती आहे की, आम्हाला तुमच्या सैन्यात स्थान द्यावे. शौर्य व साहस दाखविता येईल अशी जबाबदारी सोपवावी.’’ अकबराने त्यांना विचारले, मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही शुरवीर आहात याचे काही प्रमाण आम्हाला द्याल काय? दोघेही म्हणाले, “पुरावा, प्रमाण म्हणजे आम्हाला माहितच नाही. आम्ही केवळ काम करणे एवढेच जाणतो.’’ हे ऐकल्यावर बादशहाचा रागाचा पारा चढला, संतापाने तो म्हणाला, “तर मग तुम्ही शूर नाही आहात मुळी, आपण मोठे वीर असल्याचा आव आणत आहात पण खरे शूर नाहीत. शूर असल्याच्या बाता मारणा-यांसाठी हा दरबार नाही.’’ बादशहाचे हे आव्हानात्मक भाषण ऐकून त्या दोघांनी देवी भवानीचे स्मरण केले व आपल्या तलवारी बाहेर काढल्या. दोघांनीही बराच वेळ तलवारबाजीचे कसब दाखविले. दोघांच्याही तलवारीतुन अक्षरक्ष: ज्वाळा बाहेर पडत होत्या. दोघांपैकी कुणीच मागे हटत नाही असे दिसत होते.शेवटची चढाई करायची म्हणून दोघांनीही ‘जय भवानी’ चा जयघोष केला. एकमेकांच्या मानेवर वार करण्यासाठी तलवारी सरसावल्या. उपस्थित मंडळी श्वास रोखून पाहत होती. पहिल्याने दुस-याच्या मानेवर वार केला, तो पडण्याच्या बेतात असताना त्यानेही तसेच प्रत्युत्तर त्याला दिले. बादशहा जागेवरून उठून धावला, मरताना ते दोघे म्हणाले, राजन, आम्ही जन्म-मृत्युमध्ये काहीच अंतर मानत नाही. तुम्ही पुरावा मागितला, वीरांकडे शौर्याचा कसला पुरावा मागता? आम्ही तर संधी मिळताच तलवारीच्या टोकाला मरण बांधून जगत असतो. अकबराला त्याच्या कृतीचा पश्चाताप झाला. त्याने त्या दोघांच्या कलेवराला कुर्निसात केला.
तात्पर्य- शूरवीर कर्माने नंतर, आधी वाणी, विचार व आचरणातून ओळखले जातात.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.