राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
प्रतिज्ञा
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : ११ / १२ / २०२३
आजचा सुविचार : विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
दिनविशेष
२००१
चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
१९९४
अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
१९७२
अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
१९६७
कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
१९४६
युनिसेफ (UNICEF) ची स्थापना
१९४१
दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३०
सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक
१८१६
इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.
१९६९
विश्वनाथन आनंद – भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता
१९४२
आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार
(मृत्यू: २६ मार्च १९९९)
१९३१
भगवान श्री रजनीश
(मृत्यू: १९ जानेवारी १९९०)
१९२९
सुभाष गुप्ते – लेगस्पिनर
(मृत्यू: ३१ मे २००२)
१९२५
राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार
(मृत्यू: १ एप्रिल २००६)
१९२२
मोहम्मद युसुफ खान ऊर्फ ‘दिलीपकुमार’ – चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल
१९१५
मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक
(मृत्यू: १७ जून १९९६)
१९०९
नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) भाषाशास्त्रज्ञ
(मृत्यू: ? ? ????)
१८९९
पु. य. देशपांडे – कादंबरीकार व तत्त्वचिंतक
१८९२
अयोध्या नाथ खोसला – स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९५४), रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४ - १९५९), राज्यसभा खासदार (१९५८ - १९५९), योजना आयोगाचे अध्यक्ष (१९५९), राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (१९६१ - १९६२), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ - १९६६), पद्मविभूषण (१९७७)
१८८२
सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक
(मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)
(Image Credit: Wikipedia)
१८६७
‘उपन्यास सम्राट‘ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक
(मृत्यू: २५ मार्च १९४०)
१८४३
डॉ. हाईनरिक हर्मन रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर. त्यांनी २४ मार्च १८८२ रोजी क्षय रोगास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा (Mycobacterium Tubercule) शोध लावला. त्या काळात सुमारे पाच सहा टक्के लोक क्षय रोगाने दगावत असत.
(मृत्यू: २७ मे १९१०)
(Image Credit: Wikipedia)
२००४
एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायिका. पद्मभूषण (१९५४), रॅमन मॅगसेसे पारितोषिक (१९७१) मिळालेल्या संगीतक्षेत्रातील प्रथम व्यक्ती, पद्मविभूषण (१९७५), कालिदास सन्मान (१९८८), भारतरत्न (१९९८)
(जन्म: १६ सप्टेंबर १९१६)
(Image Credit: Wikipedia)
२००२
नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ‘नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ
(जन्म: १६ जानेवारी १९२०)
२००१
रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
(जन्म: १७ मार्च १९०९)
१९९८
रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी
(जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)
१९८७
गुरूनाथ आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक
(जन्म: १० जुलै १९२३)
१७८३
रघुनाथराव पेशवा
(जन्म: १८ ऑगस्ट १७३४)
पंचांग
बोधकथा
निर्मळता
गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्यापाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैलगाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला- असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला, “गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल.” गुरुजी म्हणाले, “अरे त्यापेक्षा तू असे कर, पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर.” शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले. तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले, “वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये.”
तात्पर्य- भावनेच्या
भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.