राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
प्रतिज्ञा
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : १४ / १२ / २०२३
आजचा सुविचार : गर्दीतले सहभागी बनण्यापेक्षा गर्दीचे कारण बना.
दिनविशेष
१९९४
चीनमधील यांगत्से नदीवरच्या महाप्रचंड अशा ‘थ्री गॉर्जेस’ धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली. १ जून २००३ रोजी या धरणात पहिल्यांदाच पाणी साठवण्यास सुरुवात झाली आणि डिसेंबर २०१५ मध्ये धारण बांधून पूर्ण झाले. या धरणाने पर्यावरण विषयक तसेच विस्थापितांच्या अनेक समस्या निर्माण केल्या आहेत.
(Image Credit: Wikipedia)
१९६१
टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४१
दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
१९३८
‘प्रभात’चा ‘गोपालकृष्ण’ हा मूकपट मुंबईच्या ‘मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. याच चित्रपटावर बेतलेला ‘प्रभात’चा बोलपट १९३८ साली प्रदर्शित झाला.
(Image Credit: Wikipedia)
१९०३
किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी विमान उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.
१८१९
अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.
१९५३
विजय अमृतराज – भारतीय लॉनटेनिसपटू
(Image Credit: Vijay Amritraj)
१९४६
संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र
(मृत्यू: २३ जून १९८०)
१९३९
सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते
(मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
(Image Credit: My Marathi Cinema)
१९३४
श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक
१९२८
प्रसाद सावकार – गायक व नट
१९२४
राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ‘द ग्रेटेस्ट शो मॅन’
(मृत्यू: २ जून १९८८)
१९१८
योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. ‘Light on Yoga’ हा त्यांचा ग्रंथ जगात ‘योगविद्येचे बायबल’ समजला जातो.
१८९५
जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)
१५४६
टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले.
(म्रुत्यू: २४ आक्टोबर १६०१)
१५०३
नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (म्रुत्यू: २ जुलै १५६६)
१९७७
गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते आणि वक्ते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५७ पटकथा आणि २००० हुन अधिक गीते लिहिली आहेत. गीतरामायणामुळे त्यांना ‘महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९५१), पद्मश्री (१९६९)
(जन्म: १ आक्टोबर १९१९)
(Image Credit: DNA India)
१९६६
शंकरदास केसरीलाल ऊर्फ ‘शैलेन्द्र’ – गीतकार
(जन्म: ३० ऑगस्ट १९२३ - रावळपिंडी, पंजाब, पाकिस्तान)
(Image Credit: gaana.com)
१७९९
जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)
पंचांग
बोधकथा
ससा आणि शिकारी कुत्रा
एक ससा शेतात शिरला. तेथील कुत्रा त्याच्यामागे धावला. ससा पुढे व कुत्रा मागे अशी शर्यत बराच वेळ चालली. शेवटी कुत्रा थांबला व मागे परतला.ते पाहून बाजूला चरत असलेल्या काही बकऱ्या म्हणाल्या, "कुत्रा केवढा मोठा आणि ससा किती लहान. पण शेवटी ससा जिंकला आणि कुत्रा हरला." ते ऐकून कुत्रा त्यांना म्हणाला, "बायांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मी रोजीरोटीसाठी धावत होतो, तर ससा प्राणासाठी धावत होता. मी नोकरी बजावायची म्हणून धावत होतो, तर ससा जिवाच्या आकांताने धावत होता. धन्यासाठी काम करणे आणि स्वत:साठी काम करणे ह्यात फरक असणारच."
तात्पर्य : प्रत्येकाने आपापली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.