राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
प्रतिज्ञा
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : शुक्रवार
आजची दिनांक : १५ / १२ / २०२३
आजचा सुविचार : आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
दिनविशेष
१९९८
बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्यांदा सुवर्णपदक
१९९१
चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर
१९७६
सामोआचा संयुक्त राष्ट्र संघटनेत (United Nations) प्रवेश
१९३५
उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार
१९३२
टी. एन. शेषन – भारताचे १० वे मुख्य निवडणूक आयुक्त (कार्यकाल: १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६), अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी
(मृत्यू: १० नोव्हेंबर २०१९)
१९०५
इरावती कर्वे – साहित्य अकादमी पुरस्कार व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ, ललित निबंधकार. त्यांचा ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा ग्रंथ जगन्मान्यता पावलेला आहे. तसेच ‘परांजपे व्याख्यानमाला’ व ‘हिंदूंची समाजरचना’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. ‘भारतीय संस्कृती’, ‘महाराष्ट्र समाज व संस्कृती’, ‘महाभारत-रामायण’ ग्रंथांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयांशी निगडित असे लेखन त्यांनी प्रामुख्याने केले आहे. ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगान्त’, ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘महाराष्ट्र एक अभ्यास’ हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ तर ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळ’ हे त्यांचे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत.
(मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)
१९०३
स्वामी स्वरुपानंद
(मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)
१८९२
जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist)
(मृत्यू: ६ जून १९७६)
१८५२
हेन्री बेक्वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)
१८३२
गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता
(मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)
६८७
पोप सर्गिअस (पहिला)
(मृत्यू: ८ सप्टेंबर ७०१)
३७
रोमन सम्राट नीरो याचा जन्म
(मृत्यू: ९ जून ६८)
१९८५
शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री
(जन्म: १८ सप्टेंबर १९००)
१९६६
वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ‘मिकी माऊस’चे जनक
(जन्म: ५ डिसेंबर १९०१)
१९५०
वल्लभभाई झंवरभाई पटेल तथा सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न (मरणोत्तर - १९९१)
(जन्म: ३१ आक्टोबर १८७५)
(Image Credit: Wikipedia)
१७४९
छत्रपती शाहू महाराज
(जन्म: १८ मे १६८२)
पंचांग
बोधकथा
स्वामी श्रद्धानंद
घटना 1919 ची आहे. इंग्रजाविरोधात संपूर्ण दिल्ली बंदची घोषणा करण्यात आली होती. लोक घरांच्या आत होते आणि रस्ते मोकळे पडले. पोलीसांची गाडी चोहीकडे फिरत होती आणि कुठे एखादे दुकान उघडे तर नाही ना याचा तपास करीत होती. संपूर्ण बाजार बंद होता परंतु एका ठेकेदाराने आपले कार्यालय उघडे ठेवले होते. पोलीसांनी त्याला ते बंद करण्याचा आदेश दिला. मात्र त्याने तो पाळला नाही. त्यामुळे जास्तच वादविवाद झाला आणि पोलीसांनी दोन स्वयंसेवकांना पकडले. या धरपकडीमुळे जनतेत क्रोधाची लाट पसरली. बघता बघता 20 हजार लोक चांदणी चौकात एकत्र जमा झाले. तेव्हा तेथे स्वामी श्रद्धानंद आले आणि त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी त्या जनसमुदायाला शांत करण्यासाठी भाषण केले. त्यामुळे जनसमुदायात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. जेव्हा स्वामीजी परत येऊ लागले तेव्हा चांदणी चौकात गोळी झाडली गेली. त्यामुळे जनतेचा राग अनावर झाला. स्वामींनी पुन्हा जनतेला शांत केले व पोलीसांना विचारले,' "तुम्ही गोळी का चालवली?'' पोलीसांनी त्यांच्यावर बंदूक रोखली व म्हटले,' "बाजूला व्हा, नाहीतर तुमच्यावरच गोळी झाडू.'' हे ऐकताच स्वामीजी पुढे झाले व त्या पोलीसासमोर जाऊन उभे राहून मोठ्या आवाजात म्हणाले, '"मारा गोळी, मरणाला आम्ही भीत नाही.'' हे त्यांचे धाडस पाहून एक इंग्रज अधिकारी पुढे आला. म्हणाला,''गोळी चुकून चालली'' स्वामीजी जनतेला घेऊन शांततेने पुढे सरकले.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.