राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
प्रतिज्ञा
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : १६ / १२ / २०२३
आजचा सुविचार : कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.
दिनविशेष
१९९१
पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
१९८५
कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
१९७१
भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
१९४६
थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९३२
‘प्रभात’चा ‘मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९०३
मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
१७७३
अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी
१४९७
वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
१९१७
सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक
(मृत्यू: १९ मार्च २००८)
१८८२
जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू
(मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)
१७७५
जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका
(मृत्यू: १८ जुलै १८१७)
१७७०
लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. स्वर्गात मी नक्कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते.
(मृत्यू: २६ मार्च १८२७)
२००४
लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता
(जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)
(Image Credit: Wikipedia)
२०००
सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती.
(जन्म: १८९९)
१९८०
कर्नल सँडर्स – ‘केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक
(जन्म: ९ सप्टेंबर १८९०)
१९६५
डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार
(जन्म: २५ जानेवारी १८७४)
१९६०
चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक
(जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)
पंचांग
बोधकथा
संत आणि शिष्य
एका संताच्या आश्रमात शेकडो गाई होत्या. ते त्या गाईच्या उत्पन्नातून ते आश्रम चालवीत असत. एकेदिवशी एक शिष्य म्हणाला,"गुरुजी! आश्रमाच्या दुधात दररोज पाणी मिसळण्यात येत आहे." संताने ते रोखण्यासाठी त्याला उपाय विचारला तेंव्हा तो म्हणाला, "एक कामगार ठेवू, तो दुधाची देखरेख करेल," संताने ते मान्य केले. दुसऱ्याच दिवशी कामगार नेमण्यात आला. तीन दिवसानंतर तोच शिष्य येवून संताला म्हणाला,"या कामगाराची नियुक्ती केल्यापासून दुधात जास्तच पाणी मिसळले जात आहे." संताने म्हटले,"आणखी एका व्यक्तीची नियुक्ती करा तो पहिल्या कामगारावर लक्ष ठेवेल" आणि तसेच करण्यात आले.
परंतु दोन दिवसानंतर आश्रमात गोंधळ उडाला, सर्व शिष्य संताकडे येवून म्हणाले,"आज दुधात पाणी तर होतेच पण त्याबरोबर एक मासाही आढळून आला," तेंव्हा संत म्हणाले," तुम्ही भेसळ रोखण्यासाठी जितके कामगार ठेवलं तितकी भेसळ जास्त होईल. कारण प्रथम या अनैतिक कामात कमी कामगारांचा सहभाग असतो तेंव्हा पाणी कमी असते, एक कामगार वाढल्याने त्याचा हिस्सा ठेवून पाणी अधिक मिसळले जावू लागले, इतके पाणी मिसल्यावर त्यात मासा नाही तर लोणी येईल." तेंव्हा शिष्यांनी यावर उपाय विचारला तेंव्हा संत म्हणाले, "यासाठी त्यांची कामावर निष्ठा वाढवावी लागेल तर ते काम प्रामाणिकपणे करतील."
तात्पर्य- प्रतिबंध लावण्याऐवजी मार्गदर्शन केल्याने, विचार बदलल्याने व्यक्ती कुमार्ग सोडून सन्मार्ग धरतील.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.