राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
प्रतिज्ञा
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : १७ / १२ / २०२३
आजचा सुविचार : द्वेषाचा चष्मा काढला की, सर्व जग प्रेमळ दिसायला लागतं.
दिनविशेष
१९७०
जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४१
दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन
१९२८
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
१९२७
हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
१७७७
फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
१७१८
ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
१९७८
रितेश देशमुख – अभिनेता
१९७२
जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल
१९४७
दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
१९२४
गोपालन कस्तुरी – पत्रकार, ‘द हिन्दू’ या वृत्तपत्राचे संपादक
(मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)
१९११
डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.
१९०५
मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७०)
(मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)
१९०१
यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ‘प्रसाद’ मासिकाचे संपादक. ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ‘दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३)
१९००
मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ
(मृत्यू: ३ एप्रिल १९९८)
१८४९
बॅरिस्टर लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे सहसंस्थापक आणि १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. १८८५ मध्ये त्यांनी लंडनच्या डेप्टफोर्ड (लंडन) मतदारसंघातून लिबरल पार्टीच्या तिकिटावर ब्रिटिश संसदेची निवडणूक लढवली आणि ब्रिटिश संसदेच्या निवडणुकीत उमेदवार असलेले पहिले भारतीय बनले.
(मृत्यू: १८ आक्टोबर १९०९)
१७७८
सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: २९ मे १८२९)
२०१९
डॉ. श्रीराम लागू – ‘नटसम्राट’, ‘हिमालयाची सावली’, ‘किरवंत’, ‘क्षितीजापासून समुद्र’ इ. अनेक नाटकांतील प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवणारे कलावंत, मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार
(जन्म: १६ नोव्हेंबर १९२७)
२०१०
देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी
(जन्म: २३ सप्टेंबर १९१९)
(Image Credit: Celebrity Born)
२०००
जाल पारडीवाला – अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक
१९८५
मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार
(जन्म: २२ मार्च १९२४)
१९६५
जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – स्वतंत्र भारताच्या भूदलाचे ३ रे सरसेनापती, पद्मभूषण, महावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते. निवृत्तीनंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या सायप्रस मधील शांतिसेनेचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले. तेथील सेवेत असतानाच त्यांना मरण आले.
(जन्म: ३० मार्च १९०६)
१९५९
डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ‘हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
(जन्म: २४ डिसेंबर १८८० - गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)
१९५६
पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य
(जन्म: २३ जानेवारी १८९८)
१९३८
चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ‘प्रवासी’, ‘मॉडर्न’, ‘रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता.
(जन्म: ११ आक्टोबर १८७६ - चांचल, माल्डा, बांगला देश)
१९३३
थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा
(जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)
१९२७
राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक
(जन्म: २३ जून १९०१)
१९०७
लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ
(जन्म: २६ जून १८२४)
१७४०
चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले.
पंचांग
बोधकथा
माणसातील देव
एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'
तात्पर्य: देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.