A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : १८ / १२ / २०२४
आजचा सुविचार : खुश होणं नाराज होणं हे केवळ तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
दिनविशेष
२००६
संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.
१९९५
अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.
१९८९
सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७८
डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९३५
श्रीलंकेत ‘लंका सम समाज पार्टी’ची स्थापना
१९७१
बरखा दत्त – पत्रकार
१९७१
अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ – स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू
१९६३
ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता
१९५५
विजय मल्ल्या – भारतीय उद्योगपती
१८९०
ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक
(मृत्यू: ३१ जानेवारी १९५४)
१८८७
भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ‘शेक्सपिअर’
(मृत्यू: १० जुलै १९७१)
१८७८
जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ५ मार्च १९५३)
१८५६
सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०)
(Image Credit: THE NOBEL PRIZE)
१६२०
हेन्रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक
(मृत्यू: २० जून १६६८)
२००४
विजय हजारे – क्रिकेटपटू
(जन्म: ११ मार्च १९१५)
२०००
मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी – इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
१९९५
कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार
१९९३
राजा बारगीर – चित्रपट दिग्दर्शक. ‘सुखाचे सोबती’ (१९५८), ‘बोलकी बाहुली’ (१९६१), ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ (१९६७), ‘मानाचा मुजरा’ (१९६९), ‘करावं तसं भरावं’ (१९७५), ‘दीड शहाणे’ (१९७९), ‘ठकास महाठक’ (१९८४), ‘गडबड घोटाळा’ (१९८६), ‘तुझी माझी जमली जोडी’ (१९९०) अशा सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.
१९८०
अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान
(जन्म: २० फेब्रुवारी १९०४)
१८२९
जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ
(जन्म: १ ऑगस्ट १७४४)
पंचांग
बोधकथा
परोपकार
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका राजाने दुसऱ्या राजासाठी एक पत्र आणि एक भेटवस्तू पाठविली. पत्रात लिहीले होते की या भेटवस्तू चे मोल तुम्ही अधिक जाणून घ्याल. ती भेटवस्तू म्हणजे एक सोन्याची डबी होती आणि त्या डबीमध्ये एक डोळ्यात घालावयाचे अंजन होते. या अंजनाचे महत्व तुम्ही जाणून घ्याल. आमच्या राज्यात या अंजनाचे महत्व अनन्य साधारण आहे. कारण हे अंजन डोळयात घालताक्षणी आंधळयाचे अंधत्व दूर होते आणि त्याला सर्व काही दिसू लागते. राजाने हे पत्र वाचताच तो विचारात पडला. कारण त्याच्या राज्यात नेत्रहीनांची संख्या भरपूर होती आणि डबीत पाठवलेले अंजन तर फक्त दोन डोळ्यांना पुरेल इतकेच होते. राजा ते अंजन आपल्या प्रियजनांसाठी वापरू इच्छित होता जेणेकरून त्याच्या मर्जीतील कोणीतरी हे जग पाहू शकेल. तेवढ्यात राजाला लक्षात आले की त्याचे एक वृद्ध मंत्री काही महिन्यांपासून कामावर येणे बंद झाले आहेत. कारण वृद्धत्वाामुळे त्यांचे दोन्ही डोळे अधू झाले होते आणि त्यांना काही दिसत नव्हते. पण हे मंत्री अतिशय हुशार, प्रजाहितदक्ष, प्रामाणिक आणि चतुर होते. ते कामावर न आल्यामुळे राजालाही काही निर्णय घेणे अवघड जात होते.
वडीलधारे असल्याने त्यांच्या सल्याने राज्यकारभार चालविणे राजाला सोपे जात होते. असा बुद्धिमान मंत्री केवळ अंधत्वाामुळे घरी बसून होता हे राजाला पाहवले नाही. त्याने त्या मंत्र्याला घेऊन येण्यासाठी सेवक पाठविले. सेवक मंत्रीमहोदयांना घेऊन दरबारात आले. राजाने मंत्र्याला सगळी कहाणी सांगितली व त्याच्या हातात ती अंजन असलेली सोन्याची डबी देऊन सांगितले, केवळ तुम्हीच याचा वापर करा. जेणेकरून तुम्हाला दिसू लागेल व राज्याला तुमच्या सल्याचा फायदा मिळेल. मंत्र्याने ती डबी हातात घेतली व तो म्हणाला, ''महाराज आताच्या आता येथे राजवैद्याला बोलावणे धाडावे.'' राजाला काहीच कळेना की मंत्री असा काय सांगत आहे. राजाने वैद्यबुवांना बोलावून घेतले व मंत्र्याच्या समोर उभे केले. मंत्र्याने सोन्याची डबी उघडली व त्यात दोन बोटे घातली. दोन्ही बोटावर लागलेल्या अंजनापैकी एक त्याने स्वत:च्या डोळयाला लावले. त्या्क्षणी मंत्र्याला एका डोळ्याने दिसू लागले व दुसरे बोटावरील अंजन त्याने वैद्यबुवाच्या जिभेवर फिरवले. राजा पाहतच राहिला. त्याने मंत्र्याला विचारले,' "मंत्रीजी तुम्ही असे काय करत आहात, एका डोळ्यातच तुम्हीत का अंजन घातले? खरेतर तुम्ही दोन्ही डोळ्यात अंजन घालू शकला असता पण तुम्ही दुसरे बोट वैद्यबुवाच्या जिभेवर का ठेवले?" मंत्री म्होणाला,' "राजन, मी जर दोन्ही डोळ्यात अंजन घातले असते तर मला दोन्ही डोळ्यांनी दिसले असते हा एक आनंदाचा भाग झाला असता व मी स्वार्थी ठरलो असतो. पण आता राजवैद्याने या अंजनाची चव घेतली आहे व त्यातून वैद्यबुवा इतके निष्णात आहेत की चवीनुसार ते अंजन बनवू शकतात, त्या अंजनात कोणते घटक मिसळले आहेत व आपणही आपल्या राज्यात असे अंजन बनवून आपल्या राज्यातली नेत्रहीनांची संख्या कमी करू शकू. यासाठी मी केवळ एका डोळयात अंजन घातले आहे.'' राजा व दरबारीजन मंत्र्याच्या या परोपकारीवृत्तीने प्रभावित झाले.
तात्पर्य :- परोपकाराची संधी जेव्हा कधी आपल्या आयुष्यात येईल तेव्हा त्या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.