A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : १९ / १२ / २०२४
आजचा सुविचार : नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका.
दिनविशेष
२००२
व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८३
ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ‘फिफा वर्ल्ड कप’ [Jules Rimet Trophy] (दुसऱ्यांदा) चोरीला गेला. सलग तीनदा वर्ल्ड कप जिंकल्यामुळे हा कप १९७० पासून ब्राझीलमध्येच होता. याआधी १९६६ च्या विश्वकप फुटबॉल स्पर्धाच्या आधी हा कप इंग्लंड मधून चोरीला गेला होता. त्यावेळी तो ‘पिकल्स’ नावाच्या एका कुत्र्याने शोधून काढला होता.
(Image Credit: FIFA)
१९६३
झांजिबारला (युनायटेड किंगडमकडून) स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.
१९६१
पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
१९४१
दुसरे महायुद्ध – अॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.
१९२७
राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.
१९७४
रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज
१९३४
प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती
१९१९
ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ‘ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १९१९)
१९०६
लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
(मृत्यू: १० नोव्हेंबर १९८२)
१८९९
मार्टिन ल्यूथर किंग सिनिअर (डॅडी किंग) – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
(मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४)
१८९४
कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या.
(मृत्यू: २० जानेवारी १९८०)
१८५२
अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: ९ मे १९३१)
१९९९
हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक
(जन्म: २४ मे १९३३)
१९९८
जनार्दन विठ्ठल (लक्ष्मण) तथा जे. एल. रानडे – भावगीतगायक
(जन्म: ? ? १९०५)
१९९७
डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
(जन्म: २० जुलै १९१९)
१९२७
राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक
(जन्म: ११ जून १८९७)
१९१५
अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ
(जन्म: १४ जून १८६४)
१८६०
लॉर्ड (जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे) डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला.
(जन्म: २२ एप्रिल १८१२)
१८४८
एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका
(जन्म: ३० जुलै १८१८)
पंचांग
बोधकथा
महत्त्व आईचे
एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न् विचारला, “स्वामीजी, संसारामध्ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्याला का दिले जात नाही? मातेइतकाच पितासुद्धा महत्वाचा असूनसुद्धा पित्याला फारसे का महत्वे दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.” स्वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्या व्यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्यांनी उचलला व त्या व्यक्तीच्या हाती देत ते म्हणाले, “बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्यानेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळून जाईल.”
दुसऱ्या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्वामी विवेकानंदांकडे आला, “स्वामीजी माझी कंबर, पोट दोन्हीही खूप दुखत आहे. एक प्रश्न काय विचारला मी, तुम्ही असे काय विचित्र उत्तर दिले त्याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.” स्वामी मंद स्मित करत म्हणाले, “बंधू, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्याझ मातेची महती ही तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठच आहे.”
तात्पर्य :- आईसारखे दैवत
साऱ्या जगतामध्ये नाही.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.