राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
प्रतिज्ञा
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : ०२ / १२ / २०२३
आजचा सुविचार : ज्ञानाच्या मंदिरात प्रवेश करताना मानापमानाचे जोडे बाहेर काढून ठेवावेत.
दिनविशेष
२००१
एन्रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
१९९९
काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर
१९८९
भारताचे ७ वे पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सूत्रे हाती घेतली.
१९८८
बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्या त्या पहिल्या महिला होत.
१९७६
फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष बनले(कार्यकाल: २ डिसेंबर १९७६ ते २४ फेब्रुवारी २००८). याआधी ते क्युबाचे १५ वे पंतप्रधान होते (कार्यकाल: १६ फेब्रुवारी १९५९ ते २ डिसेंबर १९७६).
१९७१
अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.
१९४२
योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.
१९४२
एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले.
१४०२
जर्मनीतील लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.
१९५९
बोम्मन ईराणी – अभिनेता
१९४७
धीरज परसाना – क्रिकेटपटू
१९३७
मनोहर जोशी – लोकसभेचे १३ वे सभापती (कार्यकाल: १० मे २००२ ते २ जून २००४), महाराष्ट्राचे १२ वे मुख्यमंत्री (कार्यकाल: १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९)
१९१३
दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट)
(मृत्यू: ३० डिसेंबर १९८२ - पुणे)
१९०५
अनंत आत्माराम काणेकर – चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार, ‘पद्मश्री’ व ‘सोविएत लँड नेहरू पुरस्कार’ विजेते. मुंबईतील ‘नाट्यमन्वंतर’ या प्रयोगशील नाट्यसंस्थेचे ते एक संस्थापक होते.
(मृत्यू: ४ मे १९८०)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
१८९८
इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (मृत्यू: २२ जुलै १९१८)
१८५५
सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश (१९०१ -१९१२), मुंबई विधानपरिषदेचे बिनसरकारी अध्यक्ष (१९१९), डिप्रेस्ड क्लास मिशनचे अध्यक्ष (१९०६), इंदूर संस्थानचे मुख्यमंत्री, प्रार्थना समाजाचे प्रमुख (१८९६), सोशल कॉन्फरन्सचे प्रमुख सचिव (१९०१) आणि काँग्रेसचे एक संस्थापक व आजीव सभासद (मृत्यू: १४ मे १९२३ - बंगळुरू, कर्नाटक)
१९९६
एम. चेन्ना रेड्डी – (अविभाजित) आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ - १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ - १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ - १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ - १९९६)
(जन्म: १३ जानेवारी १९१९ - पेड्डामंगलम, मोईनाबाद, आंध्र प्रदेश)
१९८०
चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान
(जन्म: १५ जुलै १९०५)
१९०६
बाळाजी प्रभाकर मोडक – ‘कालजंत्री‘कार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन व तारीख यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे, विज्ञानप्रसारक, लेखक
(जन्म: २१ मार्च १८४७)
१५९४
गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ
(जन्म: ५ मार्च १५१२)
पंचांग
बोधकथा
हिऱ्यापेक्षा जनता महत्वाची
त्याने त्याच्या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले, ''ही अंगठी घेऊन शेजारच्या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परिस्थिती सांगा. तो राजा आपली अवस्था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हिऱ्याच्या बदल्यात त्याच्याकडून धान्य मागून आणा व जनतेत वाटप करा.''
मंत्र्यांनी राजाला विचारले, ''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्ही का विकत आहात? दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्हणाला, ''माझे राज्य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू? प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्हा प्राप्त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''
तात्पर्य :- आपल्या
हाती जर सत्ता असेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल हे पाहणे इष्ट
ठरते.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.