राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
प्रतिज्ञा
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : २० / १२ / २०२३
आजचा सुविचार : भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
दिनविशेष
२०१०
भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर
१९९९
पोर्तुगालने ‘मकाऊ’ हे बेट चीनला परत दिले.
१९९४
राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ‘जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान
१९७१
झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९६७
‘रंगायन’ निर्मित, विजय तेंडुलकर लिखित आणि अरविंद देशपांडे दिग्दर्शित ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील ‘रवींद्र नाट्यमंदिर’ येथे दुपारी साडे तीन वाजता झाला. या नाट्यप्रयोगात सतीश दुभाषी, सुलभा देशपांडे असे दिग्गज कलाकार होते. राज्य नाट्यस्पर्धेत जरी या नाटकाला पारितोषिक मिळाले नसले तरी पुढे या नाटकाला ‘कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक’ हे अत्यंत मानाचे पारितोषिक व अनेक पुरस्कार मिळाले. अनेक भाषांमध्ये ‘शांतता कोर्ट चालू आहे’ चे भाषान्तर आणि प्रयोग झाले. अनेक ठिकाणी हे नाटक अभ्यासक्रमात लावले गेले. रंगभूमीवरील काही महत्त्वाच्या नाटकांमध्ये ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकाचा समावेश होतो. मराठी रंगभूमीच्या प्रवासात ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक एक मैलाचा दगड ठरले आहे.
१९४५
मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
१९४२
दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.
१९२४
हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
१९४२
राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ‘हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)
१९४०
यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री (१९६७)
१९०१
रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: १६ जानेवारी १९६७)
१८९०
जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – झेक रसायनशास्त्रज्ञ, ‘इलेक्ट्रो केमिकल अॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक (१९५९) देण्यात आले.
(मृत्यू: २७ मार्च १९६७)
१८६८
हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक
(मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)
२०१०
नलिनी जयवंत – अभिनेत्री
(जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)
२०१०
सुभाष भेंडे – लेखक
(जन्म: १४ आक्टोबर १९३६)
१९९८
बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी
(जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
१९९६
कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्नामुळे लागला.
(जन्म: ९ नोव्हेंबर १९३४ - ब्रुकलिन, न्यूयॉर्क, यु. एस. ए.)
१९९६
दगडू मारुती तथा ‘दया’ पवार – ‘बलुतं’कार दलित लेखक
(जन्म: १५ सप्टेंबर १९३५)
१९९३
वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार
१९५६
देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ‘संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
(जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)
१९३३
विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.
(जन्म: २२ मे १८७१)
१७३१
छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा
(जन्म: ४ मे १६४९)
पंचांग
बोधकथा
शेती आणि देव
एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते. कारण कधी पाऊस जास्त पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वाऱ्याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले, “तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल, इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी कशा घालतो ते पहाच तुम्ही..” देव हसला आणि म्हणाला, “तथास्तू , तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर” इतके बोलून देव निघून गेला.
शेतकऱ्याने या वरदानाचा
फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा त्यााला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने
पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या
पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतकऱ्याला
मोठा आनंद झाला. कधी नव्हे इतके पीक आले होते. शेतकऱ्याने मनातल्या मनात विचार
केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतकऱ्यांना
कसा त्रास होईल ते तो वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने,
गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो
बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्हाच्या त्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हाताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्हााचा
दाणा भरला गेला नव्हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला.
त्याचे काळीज पिळवटणारे रडणे ऐकून परमात्मा परमेश्वर
तेथे प्रकट झाला आणि म्हणाला, “अरे वेड्या तुला काय वाटले,
तू तुझ्या इच्छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येत
नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वाऱ्यात पिक उभे
राहते तेव्हाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा
बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही.
सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हान मिळाले
नाही म्हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा
पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याोची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन
जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्हणून तुझे पीक
हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्हाच
ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.” आता
शेतकऱ्याला जीवनाचे सार उमगले होते.
तात्पर्य - जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्याच्यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्वी व्हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्यानेच संकटे दूर होतात. त्याच्यांपासून दूर पळून नाहीत.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.